शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

उंची वाढविण्यासाठी उमेदवाराने लढविली विगची शक्कल!

By admin | Updated: March 26, 2017 00:21 IST

नाशिक : भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने उंची वाढविण्यासाठी चक्क डोक्यावर नकली केसांचा टोप लावला होता़ अर्थात, त्याची ही बनवेगिरी चाणाक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली

नाशिक : परीक्षेत पास होण्यासाठी कॉपीबहाद्दरांकडून विविध शक्कल लढविणारे अनेक नमुने आपण यापूर्वी पाहिले असतील़ मात्र, कायदा व सुव्यवस्था राखणारे व गुन्हेगारांना जरब बसविणाऱ्या पोलिसांना शनिवारी (दि़ २५) चक्क भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने ‘मामू’ बनविण्याचा प्रयत्न केला़ या उमेदवाराने उंची वाढविण्यासाठी चक्क डोक्यावर नकली केसांचा टोप लावला होता़ अर्थात, त्याची ही बनवेगिरी चाणाक्ष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली व या युवकास कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागले़ नाशिक शहर पोलीस दलातील रिक्त पदांसाठी बुधवारपासून (दि़ २२) पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर भरतीप्रक्रिया सुरू आहे़ या प्रक्रियेच्या चौथ्या दिवशी अर्थात शनिवारी त्र्यंबकेश्वरहून राहुल किसन पाटील आला होता़ त्याने पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या १६५ सेमीपेक्षा अधिक उंची भरावी यासाठी वेगळीच शक्कल लढविली़ तो चक्क केसाचा टोप परिधान करून आला होता़पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची प्रथम उंची, छाती मोजली जाते़ त्यानुसार त्याची उंची मोजण्यात आली़ विशेष म्हणजे डोक्यावर लावलेल्या टोपमुळे त्याची उंचीही भरतीसाठी आवश्यक तितकी भरली व त्यास पात्रही ठरविण्यात आले़ मात्र, एका चाणाक्ष पोलीस कर्मचाऱ्यास त्याच्या केसांबाबत संशय आला व त्याने ही बाब पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आणून दिली़ त्यांनी तत्काळ त्यास जवळ बोलावून तपासणी केली असता त्याने डोक्यावर विग लावल्याचे उघडकीस आले.पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पोलीस खात्याची फसवणूक करणाऱ्या या युवकास भरतीप्रक्रियेत अपात्र ठरविले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत़ पोलीस खात्यामध्ये भरती होण्याचे अनेक युवकांचे स्वप्न असते़ अर्थात यासाठी मेहनत, प्रयत्नांबरोबरच सत्याची कास धरणे आवश्यक असते़ या खात्यात भरती होण्यासाठी युवकाने लढविलेली शक्कल उघडकीस आली व त्याचे बिंग फुटले़ दरम्यान, या उमेदवारावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)पोलीस भरतीसाठी आलेल्या युवकाची उंची आवश्यक तितकी भरल्याने प्रथम त्यास पात्र ठरविण्यात आले होते़ मात्र त्याचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर अपात्र ठरविण्यात आले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे़ पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी अशा प्रकारे कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा सहारा घेऊ नये अन्यथा आयुष्यभरासाठी नोकरीची संधी गमवावी लागेल़- श्रीकांत धिवरे, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर