शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

थकबाकीदारांविरोधात धडक मोहीम

By admin | Updated: March 25, 2017 23:01 IST

कळवण : नगरपंचायतने नगरपंचायत हद्दीतील मोठमोठ्या ४०१ थकबाकीदारांच्या नावाची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले

कळवण : नगरपंचायतने शहरातील मुख्य रस्ते व चौकात नगरपंचायत हद्दीतील मोठमोठ्या ४०१ थकबाकीदारांच्या नावाची यादी जनतेच्या माहितीस्तव फलकावर लावण्याने घरपट्टी थकबाकीदारांसह विविध संस्था व कार्यालयांचे धाबे दणाणले असून, थकबाकीदारांची यादी पहाण्यासाठी व आपले नाव आहे का? याची खातरजमा करण्यासाठी चौकाचौकात व रस्त्यावर कळवणकरांची गर्दी होत असून, याचा परिणाम म्हणून कळवण नगरपंचायतची लाखो रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.  घरपट्टी वसुलीची धडक कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आल्यानंतर कळवणकर जनतेने या धडक कार्यक्रमाचे कौतुक करून थकबाकी भरून सहकार्य केले आहे. शहरातील लहान-मोठ्या ४०१ थकबाकीदारांकडून प्रथम वसुली करा, असा सूर निघत असून, जनतेच्या माहितीसाठी जाहीर ठिकाणी फलक लावण्यात आल्याने कळवण नगरपंचायतमध्ये थकबाकीदारांनी थकबाकी भरण्यास गर्दी केली आहे. कळवण नगरपंचायत हद्दीतील ४०१ थकबाकीदारांनी आपली थकबाकी जमा केली नाही तर त्यांच्यावर संबंधितांच्या मालमत्तांवर जप्तीची, लिलावाची आणि पंचायतचे नाव लावण्याची प्रक्रि या हाती घेतली जाईल, असा इशारा कळवण नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी दिला आहे.  महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व नगरपंचायत व नगर परिषदांना प्रलंबित थकबाकींच्या वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. सर्व नगर परिषदा, नगरपंचायती यांनी दि. ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी यांची १०० टक्के वसुली करण्याचे आदेश सर्व नगरपंचायत व नगरपरिषदांना दिलेले आहेत. या वसुलीबाबत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, संचालक नगर परिषद हे दररोजच्या दररोज वसुलीचा आढावा घेत आहेत.कळवण नगरपंचायत मालमत्ताधारकांकडून लाखो रु पयांची येणे बाकी असून, थकीत कराची १०० टक्के वसुली व्हावी व कर वसुलीची मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. शहरातील थकबाकीदारांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी थकबाकी रक्कम न भरल्याने शहरातील थकबाकीदारांना जप्तीची कारवाई करण्याची नोटिसा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२, १५५, १५६ व १६२ अन्वये १२ टक्के विलंब आकार लावण्यात येईल. कलम १५२ अंतर्गत दावा केलेल्या कराच्या व पाणीपट्टीच्या रकमांची वसुली अधिनियमाच्या कलम १५५, १५६, १६१ अंतर्गत जाहीर लिलावाद्वारे विक्री करून थकीत रक्कम वसूल करण्याचे अधिकार नगरपंचायतला असल्याने या थकीत मालमत्ता-धारकांनी कराची व पाणीपट्टीची रक्कम ३१ मार्च आत भरावी. अन्यथा स्थावर किंवा जंगम मालमत्ता जप्त करून जाहीर लिलाव किंवा मोहरबंद बोली मागवून विक्र ी करण्यात येईल. जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे बोली न झाल्यास सदर मालमत्तेवर नगरपंचायतचे नाव लावण्यात येईल, असे नोटिसीद्वारे सुचित करण्यात येणार आहे. (वार्ताहर)देवळ्यात नळजोडण्या खंडित करणारदेवळा : थकबाकीदारांनी नगरपंचायतीच्या थकबाकीचा भरणा ३० मार्चपर्यंत न केल्यास या रकमेवर दंड व व्याज आकारण्यात येईल, असा इशारा देवळा नगरपंचायत प्रशासनाने दिला आहे. देवळा नगरपंचायतीची थकबाकीदारांकडे २९ लाख रु पयांची घरपट्टी व पाणीपट्टी थकलेली आहे. आतापर्यंत यापैकी अंदाजे तीन लाख रु पयांची थकबाकी वसुली झाली असून, सोमवारपासून नगरपंचायत प्रशासन थकबाकीदारांच्या घरासमोर ढोलताशा वाजवून संबंधित थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडित करणार असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे. देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथमच थकबाकीदारांकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबवत देवळा नगरपंचायतीने थकबाकीदारांच्या नावांचे फलक चौकांमध्ये लावले. यामुळे ग्रामपालिका अिस्तत्वात असतांना थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणार्या प्रस्थापितांना यापुढे वेळेवर घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा संदेश ह्या फलकांद्वारे मिळाल्याने नियमति घरपट्टी व पाणीपट्टी भरणा-या नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील पाचकंदील, व मुंजोबापार चौकात नगरपंचायतीने थकबाकीदारांच्या नावांचे फलक लावले आहेत.फलकांवरील नावे वाचण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.काही थकबाकीदारांनी नगरपंचायतीकडे थकबाकी भरल्यानंतर फलकावरील त्यांच्या नावांवर काळ्या रंगाचा पट्टा मारु न ती नावे पुसण्यात आली.शहरात लावलेले हे फलक सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत.