शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना पाचारण

By admin | Updated: September 5, 2015 00:29 IST

उपरती : दुसऱ्या पर्वणीत होणार फायदा

नाशिक : पहिल्या पर्वणीत पोलीस बंदोबस्ताचे अतिरेक, भाविकांसह नाशिककरांचे झालेले प्रचंड हाल, भाविकांना करावी लागलेली पायपीट यामुळे माध्यमांनी पोलिसांच्या नियोजनाबाबत टीकेची झोड उठविलीहोती़ या चुकीच्या नियोजनाची पोलीस प्रशासनाला उपरती झाली असून दुसऱ्या पर्वणीसाठी त्यांनी गत सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाचारण केले आहे़गत सिंहस्थ कुंभमेळ्यात सद्यस्थितीत मुंबईला विशेष पोलीस महानिरीक्षक असलेले रवींद्र सिंघल हे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यान्वित होते़ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा पार पडला होता़ तर सद्यस्थितीत पुण्याचे पोलीस उपआयुक्त मकरंद रानडे हे नाशिक शहरात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते़ या दोघांनाही कुंभमेळ्यातील बंदोबस्ताची तसेच शहराची जाण आहे़ त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा लाभ व्हावा यासाठी त्यांना दुसऱ्या व तिसऱ्या पर्वणीसाठी पाचारण करण्यात आले आहे़ राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी पहिल्या पर्वणीनंतर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती़ या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांना रवींद्र सिंघल व मकरंद रानडे यांच्या अनुभवाचा फायदा का घेतला जात नाही याबाबत विचारणा केली होती़ त्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला असून ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत ते नाशिकला असणार आहे़ तर सिंघल हे नाशिकमध्येच असून त्यांच्याकडे त्र्यंबकेश्वरच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्याची शक्यता आहे़ तर मकरंद रानडे यांच्याकडे शहराच्या बंदोबस्ताबाबत जबाबदारी देण्याची शक्यता आहे़ अशोक मोराळे, हेमराजसिंह राजपूत यांना यापूर्वीच सिंहस्थासाठी बोलविण्यात आले आहे़ थोडक्यात पोलीस दलास उशिरा का होईना जाग आली असून या अनुभवी अधिकाऱ्यांचा शहरातील बंदोबस्त, तसेच भाविकांची ससेहोलपट कमी करण्यात कितपत फायदा होतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे़ (प्रतिनिधी)