शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

By admin | Updated: May 25, 2015 00:36 IST

महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा

विजय मोरे -नाशिक :सिंहस्थ पर्वणीकाळात स्नानासाठी शहरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या मदतीसाठी मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहेत़ मात्र ज्या भाविकांना मोबाइल वा अ‍ॅप्लिकेशन कळत नाही त्यांचे काय? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे़ यावर महापालिकेतर्फे भाविकांसाठी पर्वणीकाळात कॉल सेंटरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, येत्या पंधरा दिवसांत ते प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार असल्याचे मनपा आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले़ सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही पर्वणी काळात शहरात बाहेरून येणारे सुमारे ८० लाख, तर शहरातील २० लाख अशी एक कोटी लोकसंख्या प्रशासनाने गृहित धरली आहे़ यावेळी येणाऱ्या भाविकांना माहिती मिळावी यासाठी आतापर्यंत ‘कुंभ लाईव्ह’सारखे चार ते पाच मोबाइल अ‍ॅप्लिेकेशन तयार करण्यात आले आहेत़ मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हे अ‍ॅप असून, यामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासह संपूर्ण शहराची अद्ययावत माहिती आहे़उदाहरणार्थ एखादा भाविक दसक घाटावर असेल व त्याला हॉस्पिटल शोधायचे असेल तर अ‍ॅपवर टाकून सर्च केले की त्वरित जवळच्या हॉस्पिटलची यादी फोन नंबर सहित उपलब्ध होते़ तसेच साधुग्राममध्ये असणाऱ्या भाविकाला एटीएम शोधायचे असेल तर त्याचीही माहिती या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहे़ याबरोबरच कुंभमेळा, शहरातील विविध स्थानांचे स्थान महात्म, बसवाहतूक, रेल्वे वाहतूक, वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते यासारखी सर्व प्रकारची माहिती या अ‍ॅप्लिकेशनमध्ये आहे़ नागरिकांनी ७०३० ३००३०० हा कॉल सेंटरचा क्रमांक येणाऱ्या भाविकांना जास्तीत - जास्त सांगावा़ जेणेकरून भाविकांना हवी ती मदत वा माहिती देणे शक्य होईल़ हे कॉल सेंटर येत्या दहा-पंधरा दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार येणार असून, त्याची चाचपणी केली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले़ (प्रतिनिधी)