शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक अत्याचार करून काकाने केला पुतणीचा खून

By admin | Updated: April 25, 2017 02:40 IST

दिंडोरी/वणी : माळेदुमाला येथे बालिकेवर चुलत काकानेच लैंगिक अत्याचार करून अल्युमिनिअमच्या तारेने गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला

 दिंडोरी/वणी : तालुक्यातील माळेदुमाला येथे आठवर्षीय बालिकेवर चुलत काकानेच लैंगिक अत्याचार करून अल्युमिनिअमच्या तारेने गळा आवळून खून केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आला. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास आमच्या हवाली करीत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत नातलग व गावकऱ्यांनी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. दरम्यान, माळेफाटा येथे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास एका आठवर्षीय बालिकेला घरच्यांनी तंबाखूची पुडी आणण्यासाठी दुकानात पाठविले होते. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने दुकानात जाऊन चौकशी केली असता तिला जाऊन बराच वेळ झाल्याचे दुकानदाराने सांगितले. त्याचवेळी संशयित विलास अण्णासाहेब महाले (३०) हादेखील दुकानात उपस्थित होता. ‘काय झाले’ अशी विचारणा करून ‘मीसुद्धा तिला तंबाखूची पुडी आणावयास सांगितले होते’, असे मयत बालिकेच्या आईला सांगून तेथून तो पसार झाला. नातेवाइकांनी शोधाशोध करूनही बालिकेचा ठावठिकाणा न लागल्याने संशयिताच्या घरास कुलूप बघून नातेवाइकांचा संशय बळावला. त्यांनी घराचे कुलूप तोडून बघितले असता सदर बालिका मृत अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी मयत बालिकेच्या आई-वडिलांनी वणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत तारगे व सहकारी दाखल झाले.वणी ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहन मोरे व डॉ राजेंद्र बागुल यांनी शवविच्छेदन केले.संशयीत फरार झाल्याने वणी पोलीसांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग नाशिकला कळविले. त्यांनी संशयित विलास अण्णासाहेब महाले याच्या मोबाईलचे लोकेशन घेऊन त्यास बोरगांव येथे ताब्यात घेतले. यावेळी मयत बालिकेच्या नातेवाईकांनी व गांवक-यानी वणी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून संताप व्यक्त केला. संशयिताला आमच्या हवाली केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. कळवण विभागाचे पोलीस उपअधिक्षक देविदास पाटील व तारगे यांनी नातेवाईकांची समजुत काढण्याचा प्रयत्न करीत असुन गांवक-यानी माळेफाटा या ठिकाणी रास्ता रोको करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या प्रकाराने वातावरण तापलेले असुन माळे गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.