शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

रोबोटिक मशीन खरेदी; माजी आयुक्तांवर निशाणा

By admin | Updated: October 15, 2016 02:19 IST

मनपा महासभा : सखोल चौकशीची सदस्यांकडून मागणी; प्रस्ताव तहकूब

नाशिक : तीन वर्षांपूर्वी नदी-नाल्यांतील गाळ काढण्यासाठी स्वित्झर्लंडवरून खरेदी केलेल्या रोबोटिक एक्सकॅव्हेटर मशीनच्या देखभालीसाठी दोन कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेत चर्चेला आला आणि सदस्यांनी मशीनच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह चिकटवित तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर निशाणा साधला. सदर मशीन खरेदीची सखोल चौकशी करण्याची मागणीही सदस्यांनी केली. महापौरांनी मात्र सदरचा प्रस्ताव सविस्तर माहितीसाठी तहकूब केला. महापालिकेने सन २०१३ मध्ये नदी-नाले साफसफाईसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चून दोन रोबोटिक मशीन खरेदी केले होते. सदर मशिनरीबाबत संबंधित एजन्सीशी केलेल्या करारनाम्यानुसार पहिल्या तीन वर्षांसाठी मोफत देखभालीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुढील तीन वर्षांकरिता देखभालीकरिता दोन कोटी पाच लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेत मान्यतेसाठी ठेवला होता. या प्रस्तावावर बोलताना विक्रांत मते यांनी सांगितले, सदर मशीन खरेदी करण्यास सदस्यांचा कडाडून विरोध असतानाही तत्कालीन आयुक्तांच्या आग्रहास्तव मशिनरीची खरेदी केली गेली. जेसीबीसारख्या दिसणाऱ्या या मशीनची नदी-नाले साफसफाईसाठी अजिबात गरज नव्हती. आता त्याच्या देखभालीवर दोन कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव ठेवणे चुकीचे आहे. महापालिकेने काही महिन्यांपूर्वीच नदीनाले स्वच्छतेसाठी एक कोटी पाच लाख रुपयांच्या निविदा काढल्या असताना आणखी हा खर्च कशासाठी असा सवाल उपस्थित केला. सदर मशिनरीचे प्रात्यक्षिक सदस्यांना दाखविण्याची विनंतीही मते यांनी केली. संजय चव्हाण यांनी तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांची याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाने बदली केल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तत्कालीन महापौर व आयुक्त यांनी बेकायदेशीरपणे निविदाप्रक्रिया राबविल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. सुधाकर बडगुजर यांनीही आउटसोर्सिंगचा कोणताही प्रस्ताव महासभेवर न आणण्याचे धोरण ठरले असताना सदरचा प्रस्ताव आलाच कसा, असा सवाल केला. उद्धव निमसे यांनीही मशीनच्या देखभालीचा प्रस्ताव तहकूब ठेवण्याची सूचना केली. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी ‘सहन होत नाही अन् सांगताही येत नाही’ अशी स्थिती मनपाची बनल्याचे सांगत रोबोटिक मशीनच्या खरेदीची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तानाजी जायभावे यांनी गेल्या चार महिन्यांपासून टायरविना सदर मशीन पडून असल्याचे सांगितले, तर अजय बोरस्ते यांनीही तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांच्यावर आरोप करत खरेदीप्रक्रियेत सहभागी लोकांची चौकशी लावण्याची मागणी केली. कुणाल वाघ, कन्हैया साळवे यांनी प्रभागात जेट मशीन, व्हॅक्युम मशीन आदि साधनांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही; मात्र ज्यांची गरज नाही अशा मशिनरी कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केल्या जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. दिनकर पाटील यांनी तत्कालीन अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्या चौकशीचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित सदरचा प्रस्ताव नामंजूर करण्याची सूचना केली. अखेर महापौर अशोक मुर्तडक यांनी सदरचा प्रस्ताव सविस्तर माहितीसाठी तहकूब ठेवत असल्याचे जाहीर केले. (प्रतिनिधी)