येवला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे आयोजित व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली. पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सुरेश खळे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. चिचोंडी बु।। ग्रामपंचायत सदस्य रवि गुंजाळ, सविता धिवर व अनिता राजगुरू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येवला जिल्हा नाशिक राजकीय व्यक्ती-पक्ष संघटना तरु णांना सुयोग्य दिशा न देता त्यांच्या ऊर्जा-शक्ती-बुद्धीचा वापर केवळ आपल्या हिताकरिता करत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला जीवन संदेश तरुणांनी ध्यानात घेऊन त्याचे आचरण करावे. स्वत:चे उद्योग-व्यवसाय उभारून स्वावलंबी जीवन जगावे, असे मत अशोक धुरंधर यांनी बोलताना व्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून संजय पगारे, शरद शेजवळ, प्रा. जितेश पगारे, महेंद्र पगारे, भगवान चित्ते, सुरेश सोनवणे, पद्मा सोनवणे, भगवान साबळे, हिरामण मेश्राम उपस्थित होते. भारतीय नागरिकांना धार्मिक, राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु आर्थिक लोकशाहीपासून जनता अजूनही दूर आहे. आर्थिक लोकशाही शिवाय राष्ट्र प्रगती करू शकणार नाही हा डॉ. आंबेडकर यांचा उपदेश- संदेश नीट समजून घेणे आवश्यक आहे. तरुणांनी त्या दृष्टीने कार्यरत होण्यासाठी स्वावलंबी बना..! व्यवसाय करा..! उद्योजक व्हा व चळवळ उभी करा, असे आवाहन शेजवळ यांनी केले. व्यवसाय मार्गदर्शन व उद्बोधन कार्यशाळेत प्रवेश सर्वांसाठी खुला व मोफत होता असे आयोजक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविकातून सांगितले. व्यवसाय मार्गदर्शन व व्यवसाय उद्बोधन कार्यशाळेचे आयोजन करून शिक्षण संस्थेने आदर्श निर्माण केला आहे, असे मत कार्यशाळेचे अध्यक्ष सुरेश खळे यांनी व्यक्त केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मयूर सोनवणे, सुनील वाघ, सुधाकर कुमावत, राहुल सोनवणे, विनोद वाघ, उमेश पगारे, प्रताप निकम, माधुरी कोकाटे, महेश गायकवाड, सागर मोरे, निखिल जाधव, शंकर बिदगर, विकास शेजवळ, रेणू कांबळे, सरला संसारे, योगिता परदेशी, ज्योती ढोकले यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्विनी ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले. कविता काळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
येवल्यात व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा
By admin | Updated: January 3, 2017 00:49 IST