शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बस दरीत कोसळण्यापासून वाचली

By admin | Updated: May 6, 2017 00:42 IST

इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी परिवहन महामंडळाची हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने ४५ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाची एशियाड हिरकणी बस दरीत कोसळण्यापासून वाचल्याने जवळपास ४५ प्रवाशांचे केवळ दैव बलवत्तर म्हणून प्राण वाचले आहेत. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना आली आहे नगर आगाराची बस (क्र . एमएच १४ बीटी ४८०२) ही सुमारे ४५ प्रवासी घेऊन जुन्या कसारा घाटात मुंबईहून नाशिककडे जात असताना समोर मालवाहू ट्रकही घाट चढत होता. याच दरम्यान मालवाहू ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाचे ट्रकवरचे नियंत्रण सुटल्याने ट्रक हेलकावे खाऊ लागला. हे दृश्य पाहून बसचालकाचेही लक्ष विचलित झाले. बघता बघता ही बस ट्रकवर जाऊन आदळली. यामुळे मालवाहू ट्रक घाटातील दरीत कोसळली. मात्र बस नियंत्रणात आणि कठड्यावर आदळून खोल दरीत जाता जाता वाचली आणि रस्त्याच्या मधोमध थाबली. याप्रसंगी ट्रकचालकाने ट्रकमधून उडी घेत आपला जीव वाचवला. या बसमध्ये जवळपास ४५ प्रवासी होते. दरम्यान, बसमधील सुरक्षित प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरत जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, सध्या जखमींवर नाशिकच्या रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी समीर चौधरी, सुनील सोनवणे, रवि देहाडे, विजय कुंडगर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .