शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

काढणीला आलेला कांदा जाळला

By admin | Updated: February 15, 2017 01:01 IST

नगरसूल : शासनाच्या धोरणाचा निषेध; शेतकऱ्यांमध्ये संताप

नगरसूल : कांद्याच्या भावात निरंतर घसरण सुरू असल्याने उत्पादन खर्चदेखील फिटत नसल्याने नगरसूल येथील शेतकऱ्याने आपल्याच शेतातील काढणीला आलेला कांदा जाळून शासनाच्या कांद्याबाबतच्या निष्क्रि य धोरणाचा निषेध केला आहे. नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी नगरसूल-सायगाव रस्त्यावर कांदा लागवडीसाठी पाच एकर शेत ठोका पद्धतीने घेतले व चार महिन्यांपूर्वी कांद्याची लागवड केली. परंतु दरम्यानच्या नोटाबंदीचा फटका या कांद्याला बसल्याने पाच एकरापैकी दोन एकर शेतातील कांदा औषधे व मजुराच्या मजुरीअभावी केवळ २० टक्केच शिल्लक राहिला. उरलेल्या कांद्याला रोगाची लागण झाल्याने खराब झाला; मात्र उरलेल्या तीन एकर क्षेत्रातील कांदा नातेवाइकांकडून उसनवारी करून वाचविला.   सध्या बाजारभावामुळे कांदा बाजार समितीत विक्री करून उत्पादन खर्चदेखील वसूल होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात कांदा जाळून टाकला. यापूर्वी कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन मित्रांनी पाणीटंचाईच्या काळात गावापासून १३० किमी अंतरावरील करंजखेड येथे ठोका पद्धतीने कांदा लागवड केली. तेव्हादेखील कांद्याला भाव नसल्याने त्यांनी उत्पादन झालेला १००० क्विंटल कांदा चाळीत साठवणूक केला. परंतु या दरम्यान भाववाढ झाली नाही. त्यामुळे त्यांनी साठवलेल्या कांद्यापैकी ९०० क्विंटल कांदा खराब झाला होता. त्यावेळेस त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपये तोटा झाला होता व यंदाच्या कांदा हंगामात पिकविलेल्या कांद्यात त्यांना उत्पादन खर्चदेखील वसूल झाला नसल्याने त्यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कृष्णा डोंगरे यांनी सांगितले.  शेती हा डबघाईचा व्यवसाय झाला असून, शासनाचे कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. मोठे उद्योग, कारखानदार, विदेशी गुंतवणूकदार यांचे हित जोपासणारे सरकार अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रतिमा तयार झाली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)