शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी पवारवाडी भागात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

आरोपी मोहंमद अमीन आरीफ अंजूम (२०) रा. यासीन मियॉका तकीया, फतेह मैदान यास अटक करण्यात आली. काल शुक्रवारी रात्री ...

आरोपी मोहंमद अमीन आरीफ अंजूम (२०) रा. यासीन मियॉका तकीया, फतेह मैदान यास अटक करण्यात आली. काल शुक्रवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान ही चोरी झाली. फिर्यादीच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटातील ३ हजार रुपये किमतीचे काटीयर कंपनीचे घड्याळ, २० ग्रॅम वजनाची चांदीची चैन, १० ग्रॅम वजनाचे लहान मुलांचे चांदीचे कंगन, अडीच हजार रुपये किमतीची सोन्याची लहान मुलाची अंगठी असा ७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.

छावणी पोलीस ठाण्याजवळ अपघात

मालेगाव : शहरातील कॅम्प रस्त्यावरील छावणी पोलीस ठाण्याजवळ पंचशील बीअरबारच्या बाजूला २ दुचाकींच्या झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. या प्रकरणी छावणी पोलिसात ॲक्टिव्हा दुचाकी क्रमांक एमएच ४१ एएक्स ६८४९ वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश अंबरसिंग पावरा यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हा कॅम्प रोडने मोसम पुलाकडे जात असताना, त्याच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र. एमएच ४१ यु २९०५) जात असताना, ॲक्टिव्हा (क्र.एमएच ४१ एएक्स ६८४९) वरील चालकाने धडक दिली. यात दुचाकीस्वार जखमी झाला. अधिक तपास पोलीस नाईक वाघ करीत आहेत.

सावतावाडीत हाणामारी

मालेगाव : तालुक्यातील सावतावाडी येथे मेंढ्या आडव्या घातल्याच्या कारणावरून वाद झाल्याने हाणामारी झाली असून, या प्रकरणी नाना रानोबा हिरे रा. सावतावाडी याच्या विरोधात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विठाबाई संजय ढेपले यांनी फिर्याद दिली. फिर्यादीच्या शेजारी असलेल्या पडीक जागेवर ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर काठीने मारून डोके फोडले, शिवीगाळ व दमदाटी केली. अधिक तपास पोलीस नाईक व्यापारे करीत आहेत.

मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण

मालेगाव : शहरातील गालीबनगर भागात मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटांत हाणामारी झाली असून, किल्ला पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अब्दुल सत्तार मोहंमद रमजान (५८) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी सोहेल अहमद शकील अहमद (रा.किल्ला झोपडपट्टी), बिलाल अजमल खान उर्फ अहमद दादा (रा.बाग-ए-महेमुद), मो. बल्लीक (पूर्ण नाव माहीत नाही) व त्यांच्या सोबतचे ३ जण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी फिर्यादी व त्याचा मुलगा अब्दुल सलाम अब्दुल अजीज यास शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याचा दम दिला. अधिक तपास उपनिरीक्षक खरगे करीत आहेत.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

मालेगाव : आराेपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सामान्य रुग्णालयात नेत असताना, आरोपीने सरकारी कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी दम देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलिसात इब्राहीम खान इस्माईल खान (३५, रा.नागछाप झोपडपट्टी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक योगेश भगवान ठाकूर यांनी फिर्याद दिली. शहरातील सामान्य रुग्णालय ते सबजेल परिसरात ही घटना घडली. आरोपीने फिर्यादीच्या हातात असलेल्या बेडीला धक्का देऊन, शर्टाची गच्ची पकडून जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. अधिक तपास उपनिरीक्षक आहेर करीत आहेत.