शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकांसाठी आपची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:17 IST

नाशिक : आम आदमी पार्टीने इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारणाचा मार्ग निवडणला असून आवाक्याबाहेरील पोकळ आश्वासने न देता ...

नाशिक : आम आदमी पार्टीने इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळ्या मार्गाने राजकारणाचा मार्ग निवडणला असून आवाक्याबाहेरील पोकळ आश्वासने न देता जनतेच्या दैनंदिन जीवनातील शिक्षण, पाणी, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देऊन दिल्लीच्या माध्यमातून जनतेसमोर उदाहण ठेवले आहे. त्याचप्रकारचे काम नाशिकसह राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शक्य असून त्यासाठी आम आदमी पार्टीने नाशिक महापालिकेसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ‘आप’चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष किशोर मंध्यान, संघटनमंत्री विजय कुंभार, सचीव धनंजय शिदे आदींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

आम आदमी पार्टीच्या राज्य कमिटीने आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील पक्षाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषद घेत आप आगामी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. आम आदमी पक्षाला गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये विशेष प्रयत्न न करताही मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पक्ष या निवडणुकांमध्ये संपूर्ण ताकद लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सद्य:स्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकासाच्या कामांसाठी ५० ते ७५ टक्के अतिरिक्त खर्च होत असून नाशिकमध्येही हीच परिस्थिती असल्याचा आरोप ‘आप’च्या पदाधिकाऱ्यानी केला. या खर्चात बचत करून नागरिकांना अल्पदरात उत्तम सेवा देणे शक्य असल्याचा दावाही यावेळी करण्यात आला. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यध्यक्षपदाची धुरा जितेंद्र भावे यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांच्याच नेतृत्वात आगामी मनपा निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे राज्य कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.