शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

By admin | Updated: September 11, 2014 00:26 IST

घोटीत दिवसाढवळ्या धाडसी चोऱ्या

 

घोटी : शहराची व्याप्ती वाढल्याने पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात घरफोड्या, धाडसी चोऱ्या, पाळीव जनावरे चोरी अशा घटनांत वाढ होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून होत आहे. दरम्यान शहरातील भरवस्तीतून एक चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी धाडसाने चोरून नेल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.शहरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटनामुळे व्यापारी, नागरिक भयभीत झाले आहेत. शहराची व्याप्ती व घोटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्र लक्षात घेता शहराच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडून चोऱ्या रोखण्यास व उपाययोजना करण्यात अपयश आले असल्याने चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. शहरातील वाढत्या चोऱ्याची मालिका थांबविण्यासाठी घोटी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, शहरातील वासुदेव चौक व भंडारदरा चौफुलीवर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी, शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी होत आहे.दरम्यान, घोटी शहरातील भरवस्तीतील युनियन बँकेसमोर उभी केलेली एम.एच.०१-एल. ए. ०६५० हे चारचाकी वाहन दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने शहरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत. याबाबत मालुंजे, ता.इगतपुरी येथील भाऊसाहेब बन्सी झणकर यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.