शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ३ मध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: November 12, 2016 01:13 IST

भाजपाकडे सर्वाधिक उमेदवा

रसंदीप झिरवाळ  पंचवटीनाशिक शहरातील सर्वात प्रतिष्ठेची लढत असणाऱ्या पंचवटीतील प्रभाग क्र मांक ३ मध्ये विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रभागातून भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वाधिक इच्छुकांची संख्या आहे, तर काँग्रेस पक्षाला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. भाजपाच्या सर्वच इच्छुकांना तयारी करण्याबाबत हिरवा कंदील दिल्याने कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षाकडे इच्छुक असून यंदा नवीन चेहरे निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. सध्या जुन्या प्रभागरचनेनुसार या प्रभागात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहे. नवीन प्रभागरचनेनुसार प्रभागात २ जागा सर्वसाधारण महिला, १ नागरिकांचा मागास प्रवर्ग, तर १ जागा सर्वसाधारण असल्याने सर्वसाधारण जागेतून इच्छुक निवडणूक रिंगणात उड्या घेण्याची शक्यता आहे. जुना प्रभाग क्र मांक ३, १०, व ११ मिळून नवीन प्रभाग क्र मांक ३ ची रचना करण्यात आली असून या प्रभागात गणेशवाडी, टकलेनगर, कृष्णनगर, जुना आडगाव नाका, विजयनगर, त्रिमूर्तीनगर, ओमनगर, हिरावाडीरोड, हिरावाडी, कमलनगर, शिवकृपानगर, धात्रक फाटा आदिंसह अन्य भागांचा समावेश करण्यात आला आहे. पंचवटीतील सर्वच प्रभागात झोपडपट्टीचा भाग जोडला असला तरी या प्रभागात बोटावर मोजण्याइतका झोपडपट्टीचा भाग जोडला गेला आहे.सध्या या प्रभागातून भाजपाकडून निवडणूक लढविण्यासाठी आमदार पुत्र, विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक आहेत, त्यातच भाजपाकडून सर्वच इच्छुकांना तयारीला लागा, असे सुचविल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळणार हे सांगणे आतातरी कठीण आहे. महिलांसाठी दोन जागा सर्वसाधारण असल्याने महिला उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या काहींनी भाजपाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही हे भाजपाने जवळपास स्पष्ट केल्याने अशा इच्छुकांना ऐनवेळी इतर पक्षाकडून उमेदवारी मिळते का, यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. सेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्यास इच्छुकांचा मोठा हिरमोड होण्याची शक्यता आहे. तूर्तास कोणत्याच पक्षाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नसली तरी ज्या त्या पक्षाकडून इच्छुक असलेल्यांनी प्रभागात प्रचाराचे काम सुरू केल्याचे दिसून येत आहे. भाजपाशी टक्कर देण्यासाठी प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेला मोठी प्रचार यंत्रणा उभी करावी लागणार आहे.