शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

उष्णतेच्या लाटेने नाशिककरांच्या जीवाची लाही लाही

By admin | Updated: March 28, 2017 17:47 IST

वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती.

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात मागील चार दिवसांपासून सातत्याने वाढ होत असल्याने नाशिककरांना उन्हाचा तडाखा बसत आहे. वाढत्या तपमानामुळे निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांच्या जीवाची लाही लाही होत आहे. शहरातील रस्ते सकाळी अकरा वाजेपासूनच ओस पडण्यास सुरूवात झाली होती. मंगळवारी (दि.२८) दुपारी शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. मंगळवारीदेखील तपमानाचा पारा ४०.३ अंशावरच स्थिरावला. आठवडाभरापासून शहराच्या तपमानाचा पारा वाढता वाढता चाळीशीच्या पुढे गेल्यामुळे नाशिककरांना ऊन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडल्याने ४०.३ इतका उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. हवामान खात्याने सोमवारी (दि.२७) दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती व्यक्त करण्यात आली. अंदाजानुसार मंगळवारी नाशिकरांना प्रखर उन्हाच्या झळा अनुभवयास आल्या. सोमवारपेक्षाही उन्हाची तीव्रता वाढली असल्याची चर्चा दिवसभर नागरिकांमध्ये सुरू होती. उष्माघातापासून संरक्षणासाठी नागरिकांकडून विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात होता. नाशिककरांनी मार्च महिन्यात एक दशकानंतर प्रथमच नाशिककरांनी मार्च महिन्यातच ४० अंश इतके कमाल तपमान अनुभवले. कमाल तपमानाचा पारा थेट ४०.३ अंशापर्यंत सरकरल्याने नाशिककर उष्म्याने हैराण झाले आहे.