शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करून पळून जायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:16 IST

याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे ...

याबाबत अधिक माहिती अशी, डिसेंबर महिन्यात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका लॉन्समध्ये पार पडलेल्या एका लग्नसोहळ्यातून १६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ४० हजारांची रोकड चोरी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादी योगिनी कातकाडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना शहरात कुठल्याही प्रकारचे धागेदोरे मिळत नव्हते. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला याबाबत माग काढण्याचे आदेश दिले. पथकाने समांतर तपास सुरू केला; मात्र गुन्ह्याची कार्यपध्दती अत्यंत वेगळ्या प्रकारची असल्याने पूर्वानुभवाच्या आधारे या गुन्ह्यात सहभागी गुन्हेगार हे सराईत मध्य प्रदेश राज्यातील असल्याचा कयास पोलिसांनी लावला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, येवाजी महाले, विशाल काठे यांच्या पथकाने अत्यंत तोकड्या माहितीवरून मध्य प्रदेशमधील इंदूर गाठले. इंदूरसह विविध शहरांमध्ये गोपनीयरित्या माहिती घेत तीन दिवस पथकाने ठिकठिकाणी सापळेही रचले; मात्र गुन्हेगार पथकाच्या हाती लागत नव्हते. मिळालेल्या एका सुगाव्यावरून पोलिसांनी संशयास्पद कारवर पाळत ठेवली आणि एका ढाब्याच्या आवारात सापळा लावला. राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट कारमधून (एम.पी०४ टीसी १३३२) संशयित गुन्हेगार ढाब्यावर आले असता साध्या वेशातील पथकाने सिनेस्टाइल त्यांना ताब्यात घेतले. अजयसिंग कप्तानसिंग सिसोदिया (२५), बादल कृष्णा सिसोदिया (१९), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (४५,रा. तिघे गुलखेडी, पिपलीयारसोडा, जि. राजगड, मध्य प्रदेश) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली कार व तीन मोबाइल जप्त केले आहेत. या तिघांना गंगापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. ५) पोलीस कोठडी सुनावली.

--इन्फो--

मोठ्या शहरांमधील लग्नसोहळ्यात हातसफाई

मध्य प्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. या टोळीचे नेटवर्क मोठे असून, या टोळीने आतापर्यंत नाशिकसह पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, संगमनेर तसेच गुजरातमधील सुरत, वापी, अहमदाबाद, तलासुरी, नवसारी आदी शहरांमध्ये अशाच प्रकारे दागिने व रोकडवर डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले आहे.

---