शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: January 2, 2016 23:26 IST

कळवणच्या मेनरोडने घेतला मोकळा श्वास

कळवण : शहरातील मेनरोडसह ठिकठिकाणी असलेले फलक अतिक्रमण निर्मूलन मोहिमेने हटविल्याने मेनरोडसह गजबजलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला. कळवण-नाशिक आणि कळवण-देवळा या मेनरोडवर तसेच महाराजा चौक, कळवण बसस्थानक परिसर, बसस्थानकाजवळील पूल, फाशी चौक, मराठी मुलांची शाळा, फुलाबाई चौक, गणेशनगर आदिंसह सार्वजनिक व शासकीय जागांवर अभिनंदन, शुभेच्छांसह विविध कार्यक्रम, उपक्रमांचे फलक कळवणकर जनतेचे लक्ष वेधून घेत असल्याने या जागांना महत्त्व आले होते. सहायक जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने या जागांनी काही दिवसांपासून मोकळा श्वास घेतला आहे. कळवणकर जनतेने या निर्णयाचे स्वागत केले असून, कळवण शहरातील रस्ते आणि वाहतुकीच्या प्रश्नावरही गंगाथरण यांनी लक्ष घालावे, अशी माफक अपेक्षा कळवणकर जनतेची आहे.सार्वजनिक व शासकीय जागांवर बॅनर्स व फलक लावण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग, कळवण नगरपंचायत यांची परवानगी असणे आवश्यक असून, परवानगी देण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग टाळाटाळ करीत नकारघंटा देत असल्याने सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, संस्था, संघटन आता हतबल झाले आहेत. परवानगी घेऊन काही मर्यादित कालावधीकरिता फलक लावता येणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले . शिवाय शासकीय जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनापरवानगीने लावण्यात आलेले बॅनर्स व फलक तत्काळ काढून घेण्याच्या सूचनादेखील केल्या गेल्या असून, सूचनांचे पालन न केल्यास सार्वजनिक व शासकीय जागा विद्रूप केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचे संकेत शासकीय यंत्रणेने दिले आहे. (वार्ताहर)