शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अंदाजपत्रकात ‘नवनिर्माण’ला ब्रेक

By admin | Updated: February 27, 2016 00:31 IST

महापालिका : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांची झोळी राहणार रिकामी

नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या आर्थिक वर्षात आपापल्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांचे नारळ वाढविण्याचे नगरसेवकांचे मनसुबे आयुक्तांच्या अंदाजपत्रकाने धुळीस मिळणार आहेत. आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सादर केलेल्या सन २०१६-१७ या वर्षाच्या अंदाजपत्रकात ‘नवनिर्माण’ला ब्रेक लावण्यात आला असून भांडवली कामांसाठी अर्थात विकासकामांसाठी अवघ्या २५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. त्यातही चालू कामांसाठी सुमारे १७७ कोटींची देयके बाकी आणि स्थानिक संस्था करापोटी शासनाकडून मिळालेला जादा ६९ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता यामुळे येत्या वर्षभरात विकासकामांची झोळी रिकामीच राहणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांना सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. सदर रकमेतून महापालिकेचा बंधनात्मक खर्च ७८३.८३ कोटी, सिंहस्थ कामांसाठी महापालिकेचा हिस्सा २० कोटी, जेएनएनयूआरएमचा हिस्सा ७६ कोटी, मुकणे धरण पाणीयोजनेसाठी ५० कोटी, भूसंपादनाकरिता ५० कोटी, १९ टक्के राखीव निधी ६१.६५ कोटी, इतर उचल रकमा ५९.०७ कोटी व अखेर शिल्लक १.४१ कोटी वजा जाता २५६ कोटी रुपये भांडवली कामांसाठी उपलब्ध होणार आहेत. सन २०१५-१६ मध्ये भांडवली कामांसाठी ४१३.३२ कोटी रुपये म्हणजे ३७.११ टक्के खर्च झाला, तर सन २०१६-१७ या वर्षासाठी त्यात केवळ २०.१५ टक्के वाढ म्हणजे सुमारे ४९६.६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवरील एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेला शासनाकडून मिळालेल्या सहायक अनुदानासह सुमारे ८२० कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यातही शासनाने जादा ६९ कोटी रुपये दिल्याने सदर रक्कम शासनाला परत करावी लागणार आहे. येत्या आर्थिक वर्षातही सहायक अनुदान मिळेल, असे गृहीत धरून ३९० कोटी रुपयांची तरतूद अनुदान स्वरूपात उत्पन्नात दर्शविण्यात आली आहे. परंतु अनुदान न मिळाल्यास प्रत्यक्ष महसूल कमी होण्याची शक्यता आयुक्तांनी वर्तविली आहे.