ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 31- शासनाच्या वतीने अॅडव्होकेट कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात शुक्रवारी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. या बदलानुसार बार काउंसिलची निवडणूक लढविण्यासाठी किमान 10 वर्ष व्यवसायाचा अनुभव असल्याची अट, बार कॉन्सिलच्या सदस्य संख्येत घट आणि बार कौन्सिल ऐवजी वकिलांच्या तक्रारींविषयी दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, अशा विविध प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार घेतला आहे. दुपारी बारच्या ग्रंथालय सभागृहात झालेल्या सभेत नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे, अॅड अविनाश भिडे यांनी प्रस्तावित बदलांची माहिती दिली.