शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी शेतकऱ्यांसाठी आंबा लागवड एक वरदान

By admin | Updated: December 26, 2016 01:40 IST

इस्रायल पद्धतीने घेणार उत्पादन : आदिवासी शेतीतज्ज्ञांचा पुढाकार

 रामदास शिंदे पेठगेल्या शेकडो वर्षांपासून पिढ्यान्पिढ्या पारंपरिक पिकांच्या विळख्यात सापडलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी आता स्थानिक शेतीतज्ज्ञांनी पुढाकार घेतला आहे. भात व नागली यासारख्या कमी उत्पादन देणाऱ्या पिकांना फाटा देत आता इस्रायलपद्धतीने आंबा लागवडीचे तंत्र विकसित करण्यात आदिवासी शेतकऱ्यांना यश आले आहे.पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर व इगतपुरीसारख्या तालुक्यात अजूनही पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याने येथील शेतकरी भात व नागली ही पारंपरिक पिके घेत आहे. मात्र या पिकांवरील खर्च व उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने आदिवासी शेतकरी वर्षानुवर्षे आर्थिक खाईत लोटला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. यावर उपाय म्हणून काही आदिवासी शेतकऱ्यांनी द्राक्ष व डाळींब सारखे पिके घेण्याचे धाडस केले; परंतु अधिक पाऊस व प्रतिकूल हवामान यामुळे शेतकऱ्यांनी बागा फुलण्याआधीच काढून टाकल्या.नजीकच्या गुजरात राज्यातील धरमपूर, कपराडा व बलसाड हा परिसर आंब्याच्या उत्पादनात अग्रेसर समजला जातो. कोकणनंतर सर्वाधिक आंब्याचे उत्पादन गुजरातच्या याच भागात घेतले जाते. पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील शेतकरी यशवंत गावंढे यांनी नेमकी हीच बाब ओळखून पेठ तालुक्यात आंब्याची तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास येथील शेतकरी विकसित होईल, यासाठी गावंढे यांनी पहिल्या शेतकरी बचतगटाची स्थापना केली. शासनाच्या कृषी विभाग, कृषितज्ज्ञ व कृषी संशोधक यांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन पेठ तालुक्यात इस्रायलपद्धतीने आंबा लागवड प्रयोग यशस्वी केला. अनेक कृषी संस्थांच्या प्रयत्नातून आदिवासी शेतकऱ्यांना अभ्यास दौरे घडवले. जैन उद्योगसमूह, आत्मा प्रकल्पसारख्या संस्थांनी पेठच्या शेतकऱ्यांना आंबा लागवडीचे तंत्र दिले. यामुळे तालुक्यात सद्य स्थितीत जवळपास शंभर एकरवर आंब्याची लागवड करण्यात आली असून, वर्षअखेर दोन हजार एकर क्षेत्रावर आंब्याची यशस्वी लागवड करून आगामी दोन वर्षांत शेतकऱ्यांना प्रतिएकर चार ते पाच लाख रु पये उत्पन्न मिळवून देण्याचा मानस यशवंत गावंढे यांनी व्यक्त केला आहे.याकामी कृषी आयुक्त कैलास मोते, आत्मा प्रकल्पाचे संचालक अशोक कांबळे, उपसंचालक आप्पा वानखेडकर, तालुका कृषी अधिकारी शिलानाथ पवार आदिंनी वेळोवेळी शेतकरी मेळावे घेऊन मार्गदर्शन केले. शेतकरी बचतगटाचे यशवंत गावंढे, रामदास वाघेरे, अशोक गवळी, पद्माकर गवळी, देवराम गवळी, पंडित भोये, एकनाथ भोये, नामदेव मोहांडकर, मोहन पवार आदि शेतकऱ्यांच्या पुढाकाराने पेठ तालुका एका नव्या कृषी क्र ांतीचा साक्षीदार होऊ पाहत आहे.