शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मोहदरी घाटात महिलेला मृतदेह

By admin | Updated: September 11, 2014 00:01 IST

मोहदरी घाटात महिलेला मृतदेह

सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गालगत सिन्नरजवळ असलेल्या मोहदरी घाटात कुचलेल्या अवस्थेत महिलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बंधाऱ्याच्या पाण्यात पालथ्या अवस्थेत महिला पडलेली असल्याची माहिती दिलीप बिन्नर यांनी मोहदरीचे पोलीसपाटील मोहन सांगळे यांनी दूरध्वनीहून दिली. सांगळे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यासोबत संपर्क साधून पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, उपनिरीक्षक दीप्ती आठवले, हवालदार आर. बी. भवर, लक्ष्मण बदादे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केल्यानंतर ३० ते ३५ वयोगटातील महिला बंधाऱ्याजवळील पाण्यात मृत अवस्थेत पडलेली दिसून आली. सदर महिलेने अंगात लाल-पिवळसर रंगाची साडी घातली आहे. तिच्या गळ्यात मंगळसूत्र, कानातले व पायात तोरड्या आहेत. या महिलेच्या हातावर इंग्रजीत एस गोंदलेले आहे. दोन्ही हातात लाल रंगाच्या प्रत्येकी बारा बांगड्या आहेत. सदर महिलेचा चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा भालेराव यांनी व्यक्त केला. त्यामुळे सदर मृतदेह कुचलेल्या अवस्थेत असल्याने जागेवर शवविच्छेदन करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेचा मृत्यू कशाने झाला किंवा घातपात आहे याबाबतचा उलगडा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर होऊ शकेल. पोलीस निरीक्षक नवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आठवले करीत आहेत. (वार्ताहर)