शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

ठक्कर बझारजवळ एकाचा निर्घृण खून

By admin | Updated: September 16, 2015 23:54 IST

गँगवार : अर्थकारणाची पार्श्वभूमी; संशयित ताब्यात

नाशिक : ठक्कर बझारजवळील हॉटेल तुळजा येथे मंगळवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने दुसऱ्या टोळक्यावर केलेल्या हल्ल्यात राहुल ऊर्फ गुणाजी गणपत जाधव (३६, रा. रामवाडी) यांची हत्त्या झाली असून, उर्वरित चौघे जखमी झाले आहेत़ त्यातील किशोर नागरे या युवकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी हिरालाल ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.सरकारवाडा पोलीस ठाण्यातील फिर्यादीनुसार संशयित परेश मोरे व जखमी किशोर नागरे यांच्यात आर्थिक कारणावरून मंगळवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास वाद झाला होता. हा वाद आपसात मिटविण्यासाठी राहुल जाधव व त्याच्या साथीदारांनी मध्यस्थी केली़ त्यानंतर गुणाजी जाधव, किशोर नागरे (२८, रामवाडी, पंचवटी), हिरालाल कृष्णा ठोंबरे (३५, रामवाडी, पंचवटी), किरण कुलकर्णी, सागर परदेशी, विकी दिवे हे भोजनासाठी ठक्कर बझारजवळील हॉटेल तुळजा येथे गेले होते़ हे सर्व हॉटेल तुळजामध्ये गेल्याची माहिती मिळाल्याने संशयित परेश मोरे हा भाऊ व्यंकटेश मोरे व साथीदारांसह तिथे आला़याठिकाणी परेश मोरे व किशोर नागरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला़ यावेळी तिथे असलेले व्यंकटेश मोरे, परेश मोरे व त्यांच्या साथीदारांनी धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने नागरे, जाधव, ठोंबरे, परदेशी यांच्या वार केले़ त्यामध्ये गुणाजी जाधवच्या डोक्यात वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर नागरे, ठोंबरे व परदेशी जखमी झाले़ त्यातील नागरेची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या घटनेनंतर संशयित फरार झाले़या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत जखमींना जिल्हा रु ग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच जाधवचा मृत्यू झाला होता. मयत गुणाजी जाधवच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हिरालाल ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित व्यंकटेश मोरे, परेश मोरे यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिसांनी यातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे़