लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : येथे मंगळवारी (दि. ६) आडगावच्या ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस पब्लिक स्कूलमध्ये ग्रामीण पोलिसांच्या वतीने, तर जितो चॅप्टर व जैन सोशल ग्रुपच्या वतीने मुंबई नाक्यावरील बिझनेस बे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही शिबिरे होणार आहेत.
‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाला सलग चौथ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवारी (दि. ५) एकलहरे गेट येथील बुद्धविहार आणि देवळा येथे रक्तसंकलन करण्यात आले. त्यात एकलहरे ग्रामपंचायतीत ३० नागरिकांनी, तर देवळा येथे २३ याप्रमाणे एकूण ५३ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.
फोटो (०५ देवळा)
देवळा येथे रक्तदान करताना प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे, सहाय्यक निबंधक सुजय पोटे, समवेत प्रहारचे कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, संजय दहीवडकर, शशिकांत पवार, दीपक जाधव आदी.
---------------
फोटो (०५ एकलहरे)
एकलहरे येथे ग्रामपंचायत व सागर जाधव मित्रमंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात प्रथम रक्तदान करून प्रारंभ करताना सागर जाधव. समवेत राजाराम धनवटे, अनिल जगताप, काका धनवटे व ग्रामपंचायत कर्मचारी.