शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

भाजपाचा खासगीकरणावर भर

By admin | Updated: March 24, 2017 00:32 IST

नाशिक : महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती. अशा बिकटप्रसंगी सत्तारूढ झालेल्या भाजपाने अनेक प्रकल्प खासगी एजन्सीच्या माध्यमातून साकारण्यावर भर देण्याचे ठरविले आहे.

 नाशिक : केंद्र व राज्यात भाजपाचे सरकार असले तरी प्रत्येकवेळी निधी मिळेलच असे नाही, त्यात महापालिकेची नाजूक आर्थिक स्थिती. अशा बिकटप्रसंगी सत्तारूढ झालेल्या भाजपाने बांधकामासह इतर अनेक प्रकल्प खासगी एजन्सीच्या माध्यमातून साकारण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. तसे संकेतच महापौर रंजना भानसी यांनी बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिले. महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२३) बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीच्या सुरुवातीलाच महापौरांनी अधिकाऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, असा सवाल उपस्थित केला. परंतु, उत्पन्नवाढीचे स्त्रोत सांगण्याऐवजी अधिकाऱ्यांनी रिंगरोडसह आरक्षित जागांवर कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प साकारण्याला अधिक पसंती दिली. शहर अभियंता उत्तम पवार यांनी शहरात आणखी काही रस्ते जोडण्यासाठी नवीन रिंगरोडचा प्रस्ताव समोर ठेवला. त्यावर महापौरांनी येत्या पंधरा दिवसांत प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आणि लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. याचवेळी महापौरांनी शहरातील क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, उद्याने उद्योजक-प्रायोजकांच्या माध्यमातून साकारण्याचा मनोदय व्यक्त केला. अनेक उद्योजक आपल्या संपर्कात असून, बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर, शहर अभियंता उत्तम पवार व अधिकारीवर्ग.