शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी

By admin | Updated: March 14, 2017 23:39 IST

नाशिक : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या गेल्या पंचवीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची निवड बिनविरोध झाली आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेवक रंजना भानसी यांची महापौरपदी, तर पहिल्यांदाच सभागृहात पाऊल ठेवणारे भाजपाचेच प्रथमेश गिते यांची उपमहापौरपदी निवड झाली. महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकल्याने कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रमण्यम् राधाकृष्णन् यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता महापौर - उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रारंभी महापौरपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. महापौरपदासाठी भाजपाच्या रंजना भानसी, तर कॉँग्रेसच्या आशा तडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला असता यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह आमदारांनी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या गटनेत्यांबरोबर चर्चा करत बिनविरोध निवडीची विनंती केली.त्यानुसार, कॉँग्रेसच्या आशा तडवी यांनी अर्ज मागे घेतल्याने महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी यांची बिनविरोध निवड पीठासन अधिकाऱ्यांनी घोषित केली. यावेळी सर्व सदस्यांनी बाके वाजवून भानसी यांचे अभिनंदन केले. त्यानंतर उपमहापौरपदासाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. उपमहापौरपदासाठी भाजपाचे प्रथमेश गिते आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुषमा पगारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परंतु, राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने प्रथमेश गिते यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, पीठासन अधिकारी बालसुब्रमण्यम् राधाकृष्णन् यांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गिते यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौर- उपमहापौरपदाची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक महापालिकेत भाजपाचे सर्वाधिक ६६ नगरसेवक असून, त्याखालोखाल शिवसेना ३५, कॉँग्रेस ६, राष्ट्रवादी ६, मनसे ५, अपक्ष ३ आणि रिपाइं १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपाच सत्तारूढ होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते. महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मतदान झाल्यास सेना-मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका यापूर्वीच जाहीर केली होती. त्यामुळे मंगळवारी (दि.१४) केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली आणि महापालिकेच्या १५ व्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.