शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणीमीटर’प्रकरणी मनसेकडून भाजपाची झडती

By admin | Updated: April 23, 2016 00:34 IST

पालकमंत्री लक्ष्य :जळगाव जिल्ह्यातील धरणात मीटर नसल्याचा दावा

नाशिक : पाणीप्रश्नी सत्ताधारी मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली असून, गंगापूर धरणातील बंद पडलेल्या पाणी लिफ्टिंग मीटरचा मुद्दा उपस्थित करत नाशिक महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या भाजपावर आता मनसेने पलटवार केला असून, पालकमंत्र्यांचा जिल्हा असलेल्या जळगाव महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पाणीमीटरच बसविले नसल्याचा दावा गटनेता अनिल मटाले यांनी केला आहे. दरम्यान, महापालिकेने धरणावर नवीन पाणीमीटर गुरुवारी बसविले असून, पंपाद्वारे पाणी उपशाची अचूक नोंद होत असल्याने मीटरचा मुद्दा गैरलागू ठरतो, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. पाणीप्रश्नी एकमेकांना घेरण्याची स्पर्धा गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेतील सत्ताधारी महाआघाडी आणि भाजपा यांच्यात सुरू आहे. मराठवाड्याला पाणी सोडल्याने नाशिककरांमध्ये भाजपाविरुद्ध कमालीचा रोष असल्याने भाजपाकडून आता सारवासारव करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचा पहिला अंक आमदार देवयानी फरांदे यांनी मेंढगिरी समितीबाबत केलेल्या विधानांमुळे पाहायला मिळाला. मात्र, सत्ताधारी महाआघाडीसह शिवसेनेलाही कोंडीत पकडण्याची व्यूहरचना भाजपाकडून सुरू आहे. त्यातच भाजपाला गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनवरील बंद पडलेल्या पाणी लिफ्टिंग मीटरचा फुटकळ विषय मिळाला आणि आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी गंगापूर धरणावर प्रत्यक्ष पाहणी करून महापालिकेसह सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही बंद मीटरप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. भाजपाकडून पाणीमीटरचा मुद्दा तापविला जात असतानाच मनसेने याबाबत राज्यातील अन्य महापालिकांच्या स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असता पालकमंत्री महाजन यांच्या जिल्ह्यातीलच जळगाव महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात पाणी लिफ्टिंग मीटर बसविले नसल्याचे लक्षात आले. याबाबत मनसेचे गटनेते अनिल मटाले यांनी सांगितले, जळगाव महापालिकेकडून वाघूर धरणातून रोज ७५ ते ८० दसलक्ष लिटर्स पाणी उचलले जाते. मात्र, वाघूर धरणात जळगाव महापालिकेने कुठलेही पाणी लिफ्टिंग मीटर बसविलेले नाही. केवळ जलशुद्धीकरण केंद्रांवर पाणीमीटर बसविले आहे. नाशिक महापालिकेने स्वत:हून आपल्या सोयीसाठी धरणावर पाणीमीटर बसविलेले आहेत. ते नादुरुस्त झाल्यानंतर त्याच्या दुरुस्ती अथवा नवीन बदलासंबंधी प्रक्रियेतून जावे लागते. हे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ज्ञात असेलच, परंतु बंद पडलेल्या पाणीमीटरचा मुद्दा उपस्थित करत मूळ प्रश्नाला बगल देण्याचा हा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोपही मटाले यांनी केला आहे. जलसंपदा खात्याकडून ज्या दिवशी महापालिकेला पत्र मिळते त्याच दिवशी भाजपाचे आमदार व पदाधिकारी गंगापूर धरणावर जाऊन पाहणी करतात, याचा अर्थ हा नियोजनबद्ध डाव असल्याचेही मटाले यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)