शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पाठिंब्याचा निर्णय स्थगित ठेवून भाजपाची खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:52 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांना दोन दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवरील आपला दबाव कायम ठेवला असून, त्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे व जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी हे दोघेही गॅसवरच आहेत, परंतु भाजपाच्या नगरसेवकांबरोबर कोकणी यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाचारण केलेले असल्यामुळे भाजपा दोन दिवसांनंतर काय भूमिका घेणार हे अप्रत्यक्ष स्पष्ट झालेले आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : नरेंद्र दराडे, कोकणी गॅसवररविवारी मध्यरात्री या मतदारांना नाशिकमध्ये आणण्यात येणार

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांना दोन दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवरील आपला दबाव कायम ठेवला असून, त्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे व जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी हे दोघेही गॅसवरच आहेत, परंतु भाजपाच्या नगरसेवकांबरोबर कोकणी यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाचारण केलेले असल्यामुळे भाजपा दोन दिवसांनंतर काय भूमिका घेणार हे अप्रत्यक्ष स्पष्ट झालेले आहे.अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी, भाजपाने यासंदर्भात अधिकृत राजकीय भूमिका न घेतल्यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत विविध अंदाज बांधले जात असताना, शिवसेनेने पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी अट भाजपाने टाकली होती, परंतु शिवसेनेने हा प्रस्ताव झिडकारल्यामुळे भाजपाचा विधान परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी मंगळवारी तातडीने मुंबईला पाचारण केलेल्या नगरसेवकांची रात्री दीड वाजता मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी, विधान परिषद निवडणुकीचा निकाल पक्षासाठी खूपच महत्त्वाचा असल्यामुळे यासंदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली असून, आणखी एक बैठक होणार असल्यामुळे दोन दिवसांत निर्णय कळविला जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजूट राखा, असे आवाहन केले. त्यामुळे मोठ्या आशेने मुंबईत गेलेल्या नगरसेवकांना त्याचबरोबर जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांना निराशेने परतावे लागले आहे. परंतु कोकणी यांना या बैठकीसाठी पाचारण करून भाजपाने अप्रत्यक्ष मतदारांना नेमके काय करायचे हे जाहीर न करता तसे संकेत दिल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, माणिकराव कोकाटे, केदा अहेर, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते. भाजपाने या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने शिवसेनादेखील गॅसवर असून, शिवसेनेने आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना केले आहे. साधारणत: रविवारी मध्यरात्री या मतदारांना नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. असे असले तरी तिन्ही उमेदवारांनी घोडेबाजाराला प्राधान्य दिल्यामुळे मतांची फाटाफूट होणारच नाही याची छातीठोक ग्वाही देण्यास कोणीही तयार नाही. कॉँग्रेस आघाडी व मित्रपक्षांच्या नगरसेवकांची बुधवारी सकाळी बैठक घेण्यात येऊन त्यांनाही सहलीसाठी नेण्याबाबत विचारविमर्श करण्यात आला आहे.