शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीच्या स्नेहभोजनास भाजपाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:09 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनी तातडीने धाव घेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच मतदारांशी संपर्क साधून व्यूहरचना केली. विशेष म्हणजे, पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित स्नेहभोजनास भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे राष्टÑवादी-भाजपाच्या छुप्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

ठळक मुद्देविधान परिषद : राष्टÑवादी-भाजपाच्या छुप्या युतीची चर्चा सुनील बागुल व प्रतापदादा सोनवणे यांच्यासह भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी , नगरसेवकची हजेरी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांच्या विजयासाठी पक्षाचे नेते अजित पवार यांनी दोन दिवस मुक्काम ठोकल्यानंतर गुरुवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा नाशिकचे प्रभारी जयंत पाटील यांनी तातडीने धाव घेत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच मतदारांशी संपर्क साधून व्यूहरचना केली. विशेष म्हणजे, पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित स्नेहभोजनास भाजपाच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यामुळे राष्टÑवादी-भाजपाच्या छुप्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.  राष्टÑवादी कॉँग्रेसने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून मित्रपक्षांची मर्जी राखण्याबरोबरच विरोधी पक्षांच्या नाराज गटावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी स्वत: नाशकात मुक्काम ठोकून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींशी संवाद साधून राष्टÑवादीला मदत करण्याची विनंती केली. त्यामुळे या निवडणुकीची राजकीय समीकरणे झपाट्याने बदलण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी १२ वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्टÑवादी भवन येथे प्रमुख पदाधिकाºयांची बैठक घेऊन विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. पक्षांतर्गत राजी-नाराजी चाचपून घेण्याबरोबरच त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून मानसन्मान देण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकारी तसेच उमेदवार शिवाजी सहाणे यांना दिल्या. तसेच मालेगावचे आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. साधारणत: दीड तास ही बैठक चालली.विधान परिषदेची निवडणूक ऐन रंगात आली असताना भाजपाच्या पदाधिकाºयांनी राष्टÑवादीच्या तंबूत हजेरी लावल्याने भाजपा-राष्टÑवादीची छुपी युती झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उद्या भाजपा या निवडणुकीबाबत नेमकी काय अधिकृत भूमिका घेते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर सध्या राष्टÑवादीच्या वळचणीला असलेले भाजपाचे नाराज आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षाच्या प्रमुख पदाधिकाºयांसाठी पंचवटीत भोजनाचे आयोजन केले होते. याठिकाणी विधान परिषद निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यात आली. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल व प्रतापदादा सोनवणे यांच्यासह भाजपाच्या काही पदाधिकाºयांनी व काही नगरसेवकांनी पाटील यांच्यासोबत स्नेहभोजन घेऊन चर्चा केली.