शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी भाजपा आक्रमकस्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2015 23:28 IST

वाक्षरी मोहीम : महासभेचा ठराव विखंडित करण्याच्या हालचाली

नाशिक : ‘उठ नाशिककर जागा हो, स्मार्ट सिटीचा धागा हो’, असे आवाहन करत नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून भाजपाने स्मार्ट सिटीच्या समर्थनार्थ आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान, भाजपाच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका महासभेने ठरावात दुरुस्ती न केल्यास राज्य शासनाने सदर घटनाबाह्य ठराव विखंडित करावा, यासाठी येत्या सोमवारी (दि.१४) सभागृहात मागणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मार्ट सिटी योजनेबद्दल विरोधाची भूमिका जाहीर केल्यानंतर महासभेने एसपीव्ही वगळून केलेला ठराव महापौर अशोक मुर्तडक यांनी शुक्रवारी (दि.११) नगरसचिव विभागाला पाठवून दिला. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानात नाशिकच्या सहभागाची शक्यता जवळपास मावळली आहे. मनसेने घेतलेली भूमिका आणि महासभेच्या ठरावाविरुद्ध भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, त्याची सुरुवात सायंकाळी मेनरोडवर नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेने करण्यात आली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी घोषणाबाजी करत स्मार्ट सिटीत सहभागाची मागणी केली. तत्पूर्वी, भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आमदार देवयानी फरांदे व आमदार सीमा हिरे यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. देवयानी फरांदे यांनी सांगितले, महापालिकेची महासभा ही सार्वभौम आहे आणि तिचे अधिकार राज्य अथवा केंद्र सरकार हिरावून घेऊ शकत नाही. मात्र, एसपीव्हीबाबत चुकीची मते मांडून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. महासभेत सदस्यांनी केवळ करवाढीला विरोध दर्शवित स्मार्ट सिटीचे समर्थन केले आहे. परंतु पीठासन अधिकारी असलेल्या महापौरांनी बहुमताचा कौल लक्षात न घेता नियम धाब्यावर बसवून निर्णय दिलेला आहे. महापालिकेत सध्या घटनाबाह्य कामकाज सुरू आहे.