शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बिटको रुग्णालयात तोडफोड

By admin | Updated: September 5, 2015 00:32 IST

महिलेच्या मृत्यूने संताप : चेंगराचेंगरीत चार जण जखमी

नाशिकरोड : मनपाच्या बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केलेल्या गर्भवती महिलेचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त जमावाने बिटको रुग्णालयाच्या दरवाजे-खिडक्यांच्या काचा फोडून, उपचार साहित्याची तोडफोड केली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला रुग्ण व जमावाच्या धक्काबुक्कीमध्ये रुग्णालयाचा कर्मचारी, दोन खासगी रक्षक जखमी झाले आहेत. यामुळे रुग्ण, कर्मचारी, नातेवाईक यांच्यात चांगलीच घबराट पसरली होती.जेलरोड आम्रपाली झोपडपट्टीत राहणारी विवाहिता राणी संदीप लाखे (वय २२) ही ९ महिन्यांची गरोदर असून तिला हृदयविकाराचादेखील आजार होता. राणी लाखे हिला गुरुवारी मध्यरात्री त्रास होऊ लागल्याने बिटको रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे तिला जास्त त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय उपचार करून सकाळी ८ वाजेच्या सुमारास अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना पावणेनऊ वाजेच्या सुमारास गरोदर राणी लाखे हिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.रुग्णालयात तोडफोडत्यानंतर काही वेळाने संतप्त जमावाने रुग्णालयात धाव घेऊन मयत राणी लाखे ही बेडवरून पडल्याने व रुग्णालयाच्या हलगर्जी- पणामुळे तिचा मृत्यू झाला असा आरोप करत प्राथमिक अपघात विभाग कक्षाच्या खिडकीच्या काचा फोडून तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेथील स्ट्रेचर, वैद्यकीय साहित्याची मोडतोड करत युवकांच्या जमावाने अतिदक्षता विभागाकडे जाताना आजूबाजूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर अतिदक्षता विभागाचा काचेचा दरवाजा व खिडक्यांच्या काचा फोडल्या. जमावाच्या आरडाओरडीमुळे व तोडफोडीमुळे रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी प्रचंड घाबरून गेले. डॉक्टर, रुग्ण, कर्मचाऱ्यांनी आपआपल्या कक्षात, खोलीमध्ये स्वत:ला वाचविण्यासाठी बंद करून घेतले होते. यावेळी उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मोडतोड केल्यानंतर काहीजणांनी बॉम्ब-बॉम्ब अशी ओरड करण्यास सुरुवात केल्याने रुग्णालयात उपचारानंतर रुग्ण, नातेवाईक, उपचार, तपासणी करण्यास आलेले रुग्ण, नागरिक, महिला हे सर्वजण घाबरून रुग्णालयाबाहेर पळू लागले. रुग्णालयाचा मुख्य दरवाजा सकाळी बंद ठेवण्यात येत असल्याने रुग्ण केसपेपर घेतात त्या ठिकाणाहून सर्वजण बाहेर पळू लागले. यामुळे चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला रुग्ण, लहान मुले खाली पडले. यामुळे रुग्णालय आवारात व बाहेर रस्त्यावर प्रचंड भीतीचे, घबराटीचे वातावरण पसरले होते. रूग्णालयात तोडफोड झाल्याची माहिती मिळताच नगरसेवक सुनील वाघ, हरिष भडांगे यांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच सदर घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे मोठ्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली.चारजण जखमीबॉम्बच्या अफवेमुळे पळताना चेंगराचेंगरीमध्ये उपचार घेण्यासाठी आलेली महिला रुग्ण रूक्साना बी. कलीम कुरेशी रा. गुलजारवाडी सुभाषरोड ही जखमी झाली आहे. तर धक्काबुक्कीमध्ये वॉर्डबॉय शिवाजी ठुबे, खासगी सुरक्षारक्षक नजमा पठाण, सागर भोळे हे चौघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी मयत रुग्णाच्या नातेवाइकांची समजूत काढली. तसेच डॉक्टरांनी नातेवाइकांना मयत होण्याचे कारण समजावून सांगितल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर बिटको रुग्णालयातील तणाव हळूहळू निवळून दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर आली; मात्र या घटनेमुळे सकाळी तपासणी, चाचणी करण्यासाठी आलेले रुग्ण, नातेवाईक तपासणी न करताच निघून गेले. (प्रतिनिधी)