शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगारांसाठी बायोमेट्रिक सिस्टीम

By admin | Updated: January 14, 2015 23:50 IST

हजेरी शेड्सवर यंत्रणा : १८३१ कामगारांची नोंदणी पूर्ण; आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेणार

नाशिक : फिल्डवर सफाई कर्मचारी हजर राहत नाहीत अथवा एकाच्या नावावर दुसराच काम करत असल्याच्या तक्रारींना आता आळा बसणार असून, महापालिकेमार्फत लवकरच शहरातील सफाई कामगारांना बायोमेट्रिक सिस्टीम लागू होणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने सहा विभाग मिळून १८३१ सफाई कामगारांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्याचे काम पूर्ण केले असल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.महापालिकेच्या अनेक प्रभागांमध्ये सफाई होत नसल्याची आणि सफाई कर्मचारी हजर राहत नसल्याच्या तक्रारी महासभांमध्ये नगरसेवकांनी वारंवार केल्या आहेत. काही भागात सफाई कामगारांच्या संख्येबाबत असमतोल असल्याने व्यवस्थित साफसफाई होत नसल्याचीही ओरड नेहमी ऐकायला मिळत असते. मागील महासभेत डेंग्यूविषयी आलेल्या लक्षवेधीवर नगरसेवकांनी धूर व औषध फवारणीबरोबरच स्वच्छतेबाबतही प्रशासनाला धारेवर धरले होते. याचवेळी सफाई कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यास तत्काळ अनुकूलता दर्शवित आरोग्य विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले होते. आयुक्तांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने शहरातील पालिका सफाई कामगारांच्या अंगठ्यांचे ठसे घेण्याचे काम विभागनिहाय सुरू केले होते. त्यानुसार सिडको विभागातील १२८ पैकी १२६, पंचवटीतील २७५ पैकी २६०, पश्चिम विभागातील ३३३ पैकी ३३०, नाशिकरोड विभागातील ४२३ पैकी ४१०, पूर्व विभागातील ४९२ पैकी ४८३ आणि सातपूर विभागातील सर्वच्या सर्व १४८ कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक सिस्टीमसाठी नोंदणी करण्यात आली असून, मलेरिया विभागातील ६० पैकी ५१ कर्मचाऱ्यांच्याही अंगठ्यांचे ठसे घेण्यात आले आहेत. एकूण १८३१ कामगारांची नोंदणी पूर्ण झाली असून, शिल्लक राहिलेल्या ६० कर्मचाऱ्यांची नोंदणी लवकरच पूर्णत्वाला जाईल. शहरात महापालिकेचे ६३ हजेरी शेड्स आहेत. या शेड्सवर बायोमेट्रिक सिस्टम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे सफाई कामगारांच्या गैरहजेरीविषयी येणाऱ्या तक्रारींना आळा बसणार आहे. दरम्यान, सफाई कामगारांना बायोमेट्रिक सिस्टम कार्यान्वित करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून लवकरच ती लागू करण्यात येणार असल्याचे डॉ. बुकाणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)