शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

भालेकर विद्यालयाची दुरवस्था

By admin | Updated: September 13, 2014 21:57 IST

भालेकर विद्यालयाची दुरवस्था

 

नाशिक : जुने नाशिकसह परिसरातील गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या हेतूने १९६८ साली स्थापन झालेल्या बी. डी. भालेकर विद्यालयाची अवस्था दयनीय झाली असून, शाळा क्रमांक २८ प्रमाणे या शाळेचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे. जुने नाशिक परिसरातील गरीब घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन नगरपालिकेच्या माध्यमातून या शाळेची १९६८ साली स्थापना करण्यात आली. तेव्हापासून या शाळेत हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. त्याकाळी शहरात जास्त विद्यालये नसल्याने आणि इंग्रजी माध्यमाचे पेव फुटले नसल्याने भालेकर विद्यालयात विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेत होते. नाशिक महापालिका अस्तित्वात आल्यानंतर शिक्षण धोरणात बदल करण्यात आले. गणपतराव काठे हे शिक्षण मंडळावर असताना त्यांनी महापालिका शाळांना सातवीपर्यंत मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची विभागणी झाली. २००० सालानंतर परिसरात निर्माण झालेल्या शाळा, इंग्रजी माध्यमांचे फुटलेले पेव आणि खासगी शाळांना मिळालेली मान्यता यामुळे येथील विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत २०१२-१३ या वर्षात सहावी ते दहावी या पाच इयत्तांसाठी ५८ विद्यार्थी शिल्लक राहिले. ५८ विद्यार्थ्यांसाठी अनुदान देणाऱ्या राज्य शासनाने विद्यार्थीसंख्येवर पटपडताळणी-दरम्यानच हरकत घेतली होती. अनुदान बंद होऊ नये यासाठी महापालिकेने येथील वर्ग आणि शिक्षक इतर शाळांमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध झाल्यानंतर ही शाळा पुन्हा सुरू झाली. आता या विद्यालयात सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु या शाळेची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की विद्यार्थीसंख्या वाढणार कशी हा प्रश्न येथे येणाऱ्या पालकांना पडल्याशिवाय राहात नाही. शाळेचा उडालेला रंग, वर्गांची झालेली अवस्था, परिसरात झालेली अस्वच्छता, तुटलेली बाकडे आणि गळणारे छत अशी अवस्था पाहिल्यानंतर कोणता पालक या शाळेत आपल्या पाल्याला शिकवायला पाठवेल, हा प्रश्नच आहे. वर्गांमधील साचलेली धूळ पाहिली तर शाळेत कधी साफसफाई होते की नाही असा प्रश्न पडतो. त्यामुळे या जागेची सुधारणा करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसवावे, अशी मागणी होत आहे. शाळेच्या परिसरात साचलेला कचरा पाहिला, तर शाळेची दैनंदिन स्वच्छता होते की नाही हा प्रश्न पडतो. या जागेची चांगली सुधारणा करून त्या ठिकाणी वर्ग सुरू झाल्यास पालकांचेही विचार बदलतील आणि त्या शाळेत विद्यार्थी येतील, असे बोलले जात आहे. नूतनीकरण नसले तरी किमान रंगरंगोटी तरी करावी, अशी अपेक्षा बाळगली जात आहे. (प्रतिनिधी)