शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदैवत भैरवनाथांची साध्या पद्धतीने महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:44 IST

लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देसिन्नर : मोजक्याच पुरोहितांची उपस्थिती

सिन्नर : लॉकडाउनमुळे येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांची यात्रा रद्द करण्यात आली. तथापि, देवस्थानचे प्रमुख हभप त्र्यंबकबाबा भगत यांच्यासह निवडक पाच जणांच्या उपस्थितीत यात्रेनिमित्त भैरवनाथ महाराज मंदिरात साध्या पद्धतीने मंगळवारी पहाटे पूजा-अर्चा करण्यात आली.गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू असलेली यात्रा कुठल्या कारणाने रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती. दरवर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून मोठ्या संख्येने भाविक सिन्नरमध्ये येत असतात, मात्र कोरोना संकटात संपूर्ण देश लढत असताना त्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून यात्रा रद्द करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने मंदिराला यापूर्वीच कुलूप लावण्यात आलेले आहे. भाविकांनी घरातूनच ग्रामदेवतेचे नामस्मरण, पूजन करावे. घरातच राहून कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन हभप त्र्यंबकबाबा भगत, कृष्णाजी भगत व विश्वस्तांनी केले होते. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास विवेक भगत यांच्या हस्ते भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीला दुग्ध व जलाभिषेक घालण्यात आला. तर मंगळवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पूजेला सुरु वात करण्यात आली. हभप त्र्यंबकबाबा भगत, विलास भगत यांच्या हस्ते पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी चार पुरोहित उपस्थित होते.यात्रा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेतल्यानंतर मंदिरात दर्शनासाठी न येता घरातच नामस्मरण करण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले होते. तरीही सिन्नर पोलिसांनी मंदिर परिसर सील केला होता. नवा पूल, सरस्वती पुलासह आजूबाजूच्या भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाच्या विनंतीला अव्हेरून काही नागरिक सकाळी मंदिर परिसरात आले खरे, मात्र त्यांना पोलिसांकडून उठाबशांचा प्रसाद मिळाला.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम