शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

फेसबुकवरुन पैशांची मागणी झाली तर सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

सद्यस्थितीत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर कोणी करत नाही‘ असे अपवादानेच कोणी सापडेल. फेसबुकचा वापर आता तर शाळकरी ...

सद्यस्थितीत फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर कोणी करत नाही‘ असे अपवादानेच कोणी सापडेल. फेसबुकचा वापर आता तर शाळकरी मुलांपासून तर वृध्दांपर्यंत सगळेच करु लागले आहे. या लोकप्रिय सोशल नेटवर्क साईटचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्हेगारांनी याकडे मोर्चा वळविला आहे. फेसबुकवरुन असुरक्षित खातेधारकांचा शोध घेत हे गुन्हेगार आर्थिक फसवणूक करु लागले आहे.

मागील काही दिवसांपासून फेसबुकचा वापर आर्थिक फसवणुकीकरिता केला जाऊ लागला आहे. फेसबुकवरील असुरक्षित असलेल्या अकाऊंटची माहिती सर्वप्रथम सायबर गुन्हेगारांकडून मिळविली जाते आणि यानंतर ते अकाऊंट आयडी हॅक करुन त्यासोबत समझोता केला जातो. फेसबुक खात्यावर कुठल्याही प्रकारची सुरक्षा सक्रिय केलेली नसल्यामुळे सहजच अशी फेसबुक खाती सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात. यामुळे नागरिकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. फेसबुक युजर्स यांनी आपल्या फेसबुकच्या सेटिंग्ज वेळोवेळी तपासून घेत ‘टर्न ऑन टु फॅक्टर ऑथेंटिकेशन’चा पर्याय स्वीकारुन आपले फेसबुक खाते सुरक्षित करुन घेण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले.

----इन्फो----

परिचयातील व्यक्तीच्याच नावाचा वापर

१) ‘मी खूप गंभीर संकटात सापडलो आहे, मला तुमच्या मैत्रीची गरज आहे, कृपया मला खालील क्रमांकावर नमुद रक्कम पाठवा’ अशा प्रकारचा मॅसेज सायबर गुन्हेगारांकडून हॅक केलेल्या फेसबुकच्या खातेधारकाच्या नावाने त्याच्याच फेसबुक वॉलवर काही दिवसांपूर्वी टाकला गेला हाेता. हॅक झालेले फेसबुक अकाऊंट महसुल खात्यातील एका अधिकाऱ्याचे होते.

२) ‘मला कोरोना झाला आहे, तसेच माझे सर्व कुटुंबीयदेखील पॉझिटिव्ह सापडले आहे, यामुळे मला आर्थिक गरज आहे. रुग्णालयाचा खर्च खुप आहे, मला लवकर तुमच्या मैत्रीच्या मदतीचा हात द्या’ अशा प्रकारचा मजकुर एका वन कर्मचाऱ्याच्या फेसबुक अकाऊंटला हॅक करुन त्याच्या फ्रेन्डलिस्टमधील व्यक्तींच्या वॉलवर पाठविण्यात आला होता.

३) ‘माझा अपघात झाला आहे. तसेच माझी पत्नी, मुलेसुध्दा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, सध्या घरात कोणीही नसून सगळे जण रुग्णालयात दाखल आहे, मला पैशांची खूप गरज आहे, शक्य तितकी मदत मला लवकर करा’ अशा प्रकारचा एक मॅसेज एका डॉक्टरच्या फेसबुक अकाऊंटच्या वॉलवर काही दिवसांपुर्वी झळकला होता; मात्र वस्तुस्थिती अशी अजिबात नव्हती. सायबर गुन्हेगाराने त्यांचे अकाऊंट असुरक्षित असल्यामुळे हॅक केले होते.

---

...अशी घ्या काळजी

फेसबुक वापरता सुरक्षिततेच्या दृष्टीनेसुध्दा काळजी घेण्याची गरज आहे. फेसबुकने आपल्या सेटिंग्जमध्ये अकाऊंट, प्रोफाईल, डेटा अशा सर्वांच्या प्रायव्हसी सेटिंग्ज उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा वापर प्राधान्याने करायला हवा. अनोळख्या व्यक्तीकडून आलेली मैत्रीची विनंती खात्री न करता स्वीकारणे टाळावे. हॅकर्सकडून आलेला मॅसेजवर विश्वास न ठेवता रक्कम पाठविण्यापूर्वी मित्र किंवा मैत्रिणीशी संपर्क करुन खरच मदतीची गरज आहे का याची खात्री करावी.

---कोट--

हॅकर्सकडून विरुध्दलिंगी आकर्षणाचा फायदा घेत पुरुषाला स्त्रीच्या नावे व स्त्रीला पुरुषाच्या नावाने मैत्रीचा प्रस्ताव फेसबुकद्वारे धाडला जातो. असे प्रस्ताव स्वीकारु नये. फेसबुक अकाऊंट सुरक्षित असल्याची खात्री करुन घ्यावी. सेटींग्जमध्ये प्रवेश करत आपल्या अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी ‘टर्न ऑन टु फॅक्टर ऑथिंटिकेशन’ पर्याय वापरावा. यामध्ये स्ट्रॉन्ग पासवर्ड टाकावा त्यानंतर आलेला ओटीपी कोड पुन्हा इन्सर्ट करुन आपले खाते सुरक्षित करावे, हा कोड कोणासोबतही शेअर करू नये.

- तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

---

पॉइंटर्स :

गेल्या वर्षभरात फसवणुकीच्या तक्रारी - ६३

फेसबुकवरुन फसविल्याच्या तक्रारी- २८

--

आर फोटो वर डमी फॉरमेट१९स्टार७२५ नावाने सेव्ह आहे. तसेच १९फ्रॉड, १९फेस नावाने फोटो.