नाशिक : मोहन चांगले खून प्रकरणातील संशयित राकेश कोष्टीच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाची वाढ के ली आहे़ चांगले खून प्रकरणानंतर सुमारे वर्षभरापासून संशयित कोष्टी फ रार होताग़त वर्षभरापूर्वी सराईत गुन्हेगार मोहन चांगले आणि दीपक सोनवणे या दोघांची गंगापूररोडवरील नवश्या गणपतीजवळील हॉटेल विसावा येथे तीक्ष्ण हत्त्याराने वार करून खून केल्याची घटना घडली होती़ या खून प्रकरणातील पाचवा संशयित राकेश कोष्टी हा गेल्या सोमवारी (दि़ १२) न्यायालयास शरण आल्यानंतर त्यास १५ मे, १८ मे, १९ मे अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ दरम्यान, पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता त्यात २० मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
चांगले खुनातील संशयित कोष्टीच्या कोठडीत वाढ
By admin | Updated: May 20, 2014 00:38 IST