शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

देशव्यापी संपामुळे शेतकऱ्यांचा फायदाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:54 IST

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० विविध शेतकरी संघटनांना एकत्रित घेऊन १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. परंतु, या संपात शेतकºयांना नुकसान सोसावे लागणार असल्याचा गैरसमज काही मंडळी पसरवित असून, अशा प्रकारे करण्यात येणारा अपप्रचार चुकीचा असल्याची भूमिका राष्ट्रीय किसान महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे सदस्य शंकर दरेकर यांनी स्पष्ट केली असून, या संपामुळे शेतकºयांचा फायदाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय किसान महासंघ : समितीच्या बहिष्कारानंतर स्पष्टीकरण

नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील ११० विविध शेतकरी संघटनांना एकत्रित घेऊन १ ते १० जूनदरम्यान देशव्यापी शेतकरी संप पुकारला आहे. परंतु, या संपात शेतकºयांना नुकसान सोसावे लागणार असल्याचा गैरसमज काही मंडळी पसरवित असून, अशा प्रकारे करण्यात येणारा अपप्रचार चुकीचा असल्याची भूमिका राष्ट्रीय किसान महासंघातर्फे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे सदस्य शंकर दरेकर यांनी स्पष्ट केली असून, या संपामुळे शेतकºयांचा फायदाच होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.राष्ट्रीय किसान महासंघाने पुकारलेल्या संपामुळे शेतकºयांचे नुकसान होणार असल्याचे सांगत नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने संपात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दरेकर यांनी बुधवारी (दि. १६) ‘लोकमत’शी बोलताना राष्ट्रीय किसान महासंघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राष्ट्रीय किसान महासभेने पुकारलेल्या शेतकरी संपादरम्यान देशभर १२८ निवडक शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा बंद केला जाणार आहे. मुळात सध्याचे सरकार केवळ शहरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन विविध धोरणे राबवित आहे व याचा फटका शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे संपकाळात केवळ शहरांचा पुरवठा बंद करून उर्वरित भागात शेतकºयांना विक्री करता येणार आहे. या संपात अशा प्रकारे महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक व नागपूर या शहरांचा पुरवठा बंद करण्याचे किसान महासंघाने नियोजन केले असून, या शहरांमध्येही मोठ्या मैदानावर शेतकºयांना आपल्या मालाची किंमत स्वत:च ठरवून परवडणाºया दरात भाजीपाला व दुधाची विक्री करता येणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले. गतवर्षी शेतकरी संपादरम्यान काही व्यापाºयांनी संपाचा गैरफायदा घेऊन चढ्या दराने भाजीपाला विकल्याचे निदर्शनास आल्याने यावर्षी शेतकºयांनी दर ठरवून मालाची थेट विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकºयांना अधिक फायदाच होणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघाचे नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर अशी व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असून, या मैदानावर शेतकºयांना थेट दूध विक्रीही करता येणार आहे; मात्र दूध संघ व दूध डेअरी यांना येथे विक्री करता येणार नाही. नाशिकमध्ये दुधाचा दर महासंघाने ६० रुपये लिटर इतका ठेवला असून, यामुळे शेतकरी फायद्यातच येणार असल्याचे सांगताना शेतकरी हितासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. गेल्या वर्षी राज्यव्यापी शेतकरी संप करताना कर्जमाफी, हमीभाव, दूध दर अशा मागण्या ठेवल्या होत्या; मात्र कर्जमाफी वगळता इतर निर्णय केंद्र सरकारच्या हातात असल्यामुळे यावेळी देशव्यापी शेतकरी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी एकत्रितरीत्या ११ एप्रिल रोजी पुण्यातील बैठकीमध्ये घेतला आहे. या बैठकीत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कोअर कमिटीत काम करण्याचा निर्णय झाल्याचेही दरेकर यांनी सांगितले.