शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’

By admin | Updated: September 16, 2016 22:35 IST

जोगलटेंभीत भ्रमणध्वनी बनले ‘शोभेची वस्तू’

नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील जोगलटेंभी परिसरातील भारत संचार निगमचे भ्रमणध्वनी शोभेची वस्तू बनले असून, वापरासाठी नागरिकांना गावाबाहेर पायपीट करावी लागत आहे.दिवसेंदिवस वाढती स्पर्धा असल्याने ग्राहकांना आपलेसे करण्यासाठी जास्तीत जास्त सेवा देण्याची विविध कंपन्यांची लगीनघाई सुरू आहे. असे असताना जोगलटेंभी गाव मात्र या सेवांपासून दोन हात दूरच आहे. गावात ५० ते ६० भारत संचार निगमचे ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून भ्रमणध्वनी गावात येताच नॉट रिचेबल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील सर्वच बीएसएनएलचे सर्व ग्राहकांचे भ्रमणध्वनी वापराविना पडून आहेत.सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेलच्या जमान्यात ग्राहकांना सेवा पुरविण्यात भारत संचार निगम जोगलटेंभी परिसरात कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. महागडे मोबाइल घेऊनही त्याचा वापर करण्यासाठी थेट गावाबाहेर जावे लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.सदर असुविधेबाबत बीएसएनएलच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे. तथापि, तरीही त्यात सुधारणा न झाल्यास बीएसएनएलचा वापर बंद करून खासगी कंपन्यांची सेवा घेण्याचा इशारा सार्वजनिक वाचनालयाचे दिलीप तांबे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विलास गाडेकर, गोदा युनियनचे संचालक बाबाजी पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर जेजूरकर, माजी सरपंच दत्तात्रय तांबे यांनी दिला आहे. (वार्ताहर)