शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा आंदोलकांचे आंदोलन मागे

By admin | Updated: April 18, 2015 23:43 IST

मेधा पाटकर : जल व जमीन हक्क सत्याग्रह

नाशिकरोड : शासनाने २८ एप्रिल ते १६ जून दरम्यान जमीन दाखविण्याचा सादर केलेला कार्यक्रम नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रतिनिधींनी मान्य केला. रोजगार हमी आणि रेशन घोटाळ्याची चौकशी करण्याचे शासनाने मान्य केल्याने शनिवारी दुपारी नर्मदाच्या आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. दरम्यान पावसाळ्यात प्रकल्पग्रस्तांची जीवित व वित्तहानी झाल्यास जल व जमीन हक्क सत्याग्रह करण्याची घोषणा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केली.नर्मदा बचाव आंदोलकांनी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बुधवारी दुपारी अचानक कुठलीही पूर्वसुचना न देता विभागीय आयुक्त कार्यालयात नर्मदा प्रकल्पबाधित पुनर्वसनाच्या प्रश्नावरून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गुरूवारी साडेआठ तास विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासोबत बैठक होऊन जमीन दाखविण्याच्या कार्यक्रमाबाबत आंदोलकांचे एकमत न झाल्याने आंदोलन सुरूच होते. शुक्रवारी देखील शासनासोबतची बोलणी फिसकटली होती. ठिय्या आंदोलनाच्या शनिवारी चौथ्या दिवशी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्यासोबत नर्मदा आंदोलनाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. नर्मदा आंदोलनाच्या प्रतिनिधींनी २७ एप्रिल ते १९ मे पर्यंत जमीन दाखवणे कार्यक्रम प्रस्ताव दिला होता. याबाबत डवले यांनी २८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत जमीन दाखवणे कार्यक्रम प्रस्ताव आंदोलकांच्या प्रतिनिधींना दिला. त्या प्रस्तावाबाबत आंदोलकांच्या प्रतिनिधींनी जेथे वस्ती आहे तेथे ७ जूनपर्यंत जमीन दाखविणे कार्यक्रम घ्यावा व त्यानंतर पावसाळा सुरू होत असल्याने जेथे वस्ती नाही अशा ठिकाणी १६ जूनपर्यंत जमीन दाखविणे कार्यक्रम घ्यावा अशी सूचना केली. यावर शासन व आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात एकमत झाल्याने गेल्या चार दिवसापासून जमीन दाखवण्याच्या मुद्यावरून फिसकटलेली बोलणी यशस्वी झाली. नंदुरबार जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झालेल्या आरोपाची विभागीय चौकशी करण्याचे डवले यांनी मान्य केले. तसेच गाव, पंचायत व तालुका पातळीवर सोशल आॅडीट करून जुनच्या प्रारंभी जनसुनावणी करण्यात येईल. रेशनिंग घोटाळ्याच्या चौकशीसाठी तालुका आणि जिल्हास्तरावर तक्रार निवारण मंच स्थापण्याचे मान्य करण्यात आले. अंत्योदय व घरपोच धान्य योजना सुरू करावयाची असल्यास येत्या १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेत बहुमताने निर्णय झाल्यास त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी मान्य केले. वनगावांचे महसुलीकरण, वनजमिनी मोजणी, घोषित व अघोषित प्रकल्पग्रस्तांची प्रक्रिया त्वरीत सुरू करणे आदि प्रश्नांवर समाधानकारक चर्चा झाली.सत्यवादी शपथपत्र द्यानर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या की, जमीन दाखवण्याच्या कार्यक्रमाबाबत २२० हेक्टर एवढीच जमीन शिल्लक आहे. ती कशी वाटणार, जमीन कमी पडल्यास खासगी जमीन घेणार का, किती जणांचे पुनर्वसन बाकी आहे याबाबत शासनदरबारी गोंधळ आहे. प्रकल्पग्रस्त चार दिवसात नोटरी शपथपत्र सादर करतील. शासनाने सत्यवादी शपथपत्र सादर करावे अशी मागणी पाटकर यांनी केली. तापी-नर्मदा मध्यम जोड प्रकल्पाद्वारे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळविण्याचा डाव असल्याचा आरोप पाटकर यांनी यावेळी केला. प्रकल्पाच्या बोगदा, बंधारा आदि कामाला ग्रामसभेची मंजुरी न घेतल्यास ही कामे करू न देण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. नर्मदा प्रकल्पाशी तीन राज्यांचा संबंध आहे. आपली ३३ गावे डुबत असतांनाही महाराष्ट्राला प्रकल्पातुन वीज किंवा पाणी मिळत नाही. ठेकेदारांच्या फायद्यासाठी ४२ कोटींचा हा प्रकल्प १० हजार कोटींवर नेण्यात आला आहे. उद्योजकांच्या फायद्यासाठीच धरणाची उंची वाढविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच याला कारणीभूत असल्याचा आरोप पाटकर यांनी केला. (प्रतिनिधी)