शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

छुपी पाणी कपात मागे

By admin | Updated: February 10, 2016 23:26 IST

प्रशासनाची शरणागती : आजपासून पाणीपुरवठा सुरळीत

नाशिक : छुप्या पद्धतीने पाणीकपात ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या प्रयोग अंगलट आल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवारी छुपी पाणीकपात मागे घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्ण क्षमतेने जलकुंभ भरू शकले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा झाला परंतु गुरुवारपासून ठरल्याप्रमाणे सुमारे १५ ते २० टक्के पाणीकपात धरून नाशिककरांना पाणीपुरवठा सुरळीत होण्याची ग्वाही मनपा प्रशासनाने दिली आहे. शहरात गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर उपमहापौर गुरुमित बग्गा आणि शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी शोधमोहीम राबवत प्रशासनाचा छुप्यारितीने सुरू असलेला ‘प्रयोग’ उघड केला. दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीकपात सुरू आहे. त्यानुसार महापालिकेकडून गंगापूर आणि दारणा धरणातून सुमारे ३५० दशलक्ष लिटर्स प्रतिदिन पाण्याची उचल केली जात होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून सदर पाण्याची उचल सुमारे ३१० ते ३२५ दशलक्ष लिटर्स केली जात आहे. महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश देऊनही प्रशासनाकडून राज्य शासनाच्या दबाबापोटी त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती, परंतु प्रशासनाने महापौरांसह पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवत छुपी पाणीकपात सुरू केल्याचे उघडकीस येताच पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर हल्लाबोल चढविला. महापौर, उपमहापौर आणि गटनेत्यांनी पत्रकारांसमक्षच पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार आणि अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांना धारेवर धरत छुपी पाणीकपात तत्काळ रद्द करण्याचे आदेशित केले. त्यानुसार, वाढीव दहा टक्के छुप्यारीतीने सुरू असलेली पाणीकपात मागे घेत प्रशासनाने शरणागती पत्करली. मंगळवारी रात्री पाणीपुरवठा विभागाने जलकुंभामध्ये १५ ते २० टक्के पाणीकपात लक्षात घेऊनच पाणी भरले. रात्री दीड ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात अडथळा आला. त्यामुळे बुधवारी सकाळी पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ शकला नसला तरी गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होण्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)