शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शासन धोरणामुळे बळीराजा चिंंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:36 IST

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे ...

दत्ता दिघोळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : शासनाने कांदा निर्यातशुल्क वाढीबरोबर आयातीचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिल्याने आठवडाभरात वाढलेल्या कांदा भावाची झपाट्याने घसरण सुरू झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेल्या अनेक दिवसांच्या कालावधीनंतर शेतकºयांच्या कांद्याला योग्य भाव मिळू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत होते. उत्पादन खर्च वजा जाता चार पैसे शेतकºयांच्या पदारात पडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबात समाधान व्यक्त होऊ लागले होते. असे असतांना ग्राहकांच्या भल्यासाठी व शहरी ग्राहकांची मर्जी राखत विकत घेणारे महत्त्वाचे मानून केंद्र शासनाने लगेच निर्यातीवर मूल्य लावण्याचे व कांदा आयातीचे संकेत दिल्याने व्यापारी वर्गाने लागलीच कांदा घसरणीस सुरूवात केल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. गेल्या आठवड्यात क्विंटल मागे सुमारे ४०० ते ५०० रुपयांनी भाव कमी झाल्यामुळे बळीराजा नाराज झाला आहे. शेतकºयांच्या कोणत्याही मालास योग्य बाजारभाव मिळण्याची वेळ आली की शहरी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येते. अशी परिस्थिती कायमचीच आहे.शेतकºयांच्या जखमेवर मीठसध्या बाजारात विक्र ीस येत असलेला कांदा उत्पादक शेतकºयांनी गेल्या तीन-चार महिन्यांपासून साठविलेला आहे. सध्या देशांतर्गतच कांद्याला मोठी मागणी व कांदा साठा अल्प प्रमाणात असताना इजिप्त देशातून कांदा आयात करण्याचे केंद्र शासनाचे संकेत शेतकºयांना आर्थिक संकटात पाडणारे आहे. शेतीपिकांना हमीभाव न देणाºया शासनाने बळीराजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार करू नये, अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे.शेजारच्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन घटल्याने महाराष्ट्रातील कांद्याला मागणी वाढल्यामुळे सध्या कांद्यास योग्य बाजारभाव मिळत आहे; मात्र कृषिप्रधान देशातच फक्त शेतकºयांना स्वत:च्या मालाचे दर स्वत:ला ठरविता येत नाही. कष्ट करून शेतात पिकविलेल्या मालाला योग्य बाजारभावाअभावी शेतकरी कुटुंब दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.