शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीसाठीच्या विनामूल्य शारीरिक प्रशिक्षण सत्रास सुरुवात

By admin | Updated: May 19, 2014 00:30 IST

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे पोलीस भरतीसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरातील शारीरिक सत्रास आजपासून मविप्रच्या मैदानावर प्रारंभ झाला़ या सत्राचे उद्घाटन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते झाले़ या शिबिराचा उमेदवारांना मोठा फ ायदा होणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले़

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या करिअर विभागातर्फे पोलीस भरतीसाठी आयोजित विनामूल्य मार्गदर्शन शिबिरातील शारीरिक सत्रास आजपासून मविप्रच्या मैदानावर प्रारंभ झाला़ या सत्राचे उद्घाटन मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांच्या हस्ते झाले़ या शिबिराचा उमेदवारांना मोठा फ ायदा होणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले़नाशिक शहर व ग्रामीण दलात होणार्‍या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर मनसेतर्फे विनामूल्य लेखी आणि शारीरिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे़ यातील शारीरिक सत्रास रविवारपासून प्रारंभ झाला़ के .टी़एच़एम़ महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सकाळी ६ ते ८ या वेळेत पोलीस भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांकडून शारीरिक प्रशिक्षण सराव करून घेतला जाणार आहे, तर सीबीएस येथील जुन्या एऩडी़सी़सी़ बँकेत लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे़ हे सत्र सोमवारपासून दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे़मविप्रचे क्रीडा अधिकारी हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक कैलास लवांड, क्रीडा मार्गदर्शक पद्माकर घुमरे, शरद पाटील, सारिका जगताप, सिद्धार्थ लाड, रमेश जुन्नरे, गणेश कोंडे, गणेश विसे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या शारीरिक प्रशिक्षण सत्रात उमेदवारांकडून गोळाफे क, लांब उडी, पाच कि़मी़ धावणे, पुलअप्स व विविध शारीरिक कवायतींचा सराव करून घेतला जाणार आहे. लेखी परीक्षेसाठी युनिव्हर्सल फ ाउंडेशनचे संचालक राम खैरनार व डॉ़ जी़ आऱ पाटील स्पर्धा परीक्षेतील विविध विषयांचे सखोल मार्गदर्शन करणार आहेत़या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी मनविसे शहराध्यक्ष मुकेश शहाणे, सुभाष कडलग, देवीदास वाटाणे, मयूर इघे, धनंजय कर्के, प्रदीप बोराडे आणि उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या विनामूल्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन आमदार वसंत गिते, अतुल चांडक, मनसे करिअर विभाग अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले आहे़