शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक-व्यापाºयांवर सरकारने केली ‘दरोडेखोरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:52 IST

आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.

नाशिक : आॅगस्ट महिन्यात कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकºयांना चांगले भाव मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आले होते. मात्र केंद्र सरकारने कांद्याचे भाव कमी होण्यासाठी नियोजनपूर्वक कांदा व्यापाºयांवर छापे टाकले. केंद्र सरकारची ही कृती म्हणजे कांदा उत्पादकांच्या खिशावर एकप्रकारे दरोडेखोरीच असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू यांनी केला.  आॅगस्ट महिन्यात कांद्याचे क्ंिवटलला भाव २४०० ते २५०० रुपये होते. दिल्लीत कांदा महाग होऊ लागल्यानेच तातडीने आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांना बोलावून केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांना ठरवून निशाणा करीत त्यांच्यावर छापेमारी केली. त्यामुळे कांद्याच्या भावात प्रचंड घसरण झाली. कांद्याचे भाव कमी करण्यासाठीच केंद्र सरकारने कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याचा आरोप आ. बच्चू कडू यांनी केला.  कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करणेच मुळात चुकीचे आहे. कांद्याला हमीभाव नसताना त्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करायला नको. एकतर कांद्याला हमीभाव जाहीर करा, मगच कांद्याचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करावा अन्यथा कांद्याला जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतून वगळले पाहिजे. कांदा न खाल्ल्याने कोणी मरत नाही. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर लवकरच आंदोलन करण्याचा प्रहार संघटनेचा प्रयत्न आहे. त्यासाठी येत्या पंधरा दिवसात चांदवड किंवा अन्यत्र कांदा उत्पादकांची परिषद घेऊन त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांगळे, दत्तू मुतर्डक, अजित आव्हाड, अनिल भडांगे, जगन काकडे, नितीन गवळी, प्रकाश चव्हाण, श्याम गोसावी, जतीन पानमंद, योगेश जाधव, सुशील शिंदे, बबलू मिर्झा, पवन ताडगे आदी उपस्थित होते.१३ आॅक्टोबरला उपोषणअपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी व्हावी, विधवांसाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे, अपंगांसाठी उद्योग व शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावे, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अनुकंपा लागू करावी, यामागण्यांसाठी अमरावती येथे उपोषण करण्यात येणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.