शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?

By admin | Updated: September 3, 2014 00:45 IST

बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला की पौर्णिमेला?

नाशिक : वाजत-गाजत बाप्पा घरोघरी मखरामध्ये विराजमान झाले खरे; परंतु दहा दिवसांनंतर बाप्पाच्या विसर्जनाबाबत गणेशभक्त संभ्रमात पडले आहेत. सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला विसर्जन होईल. परंतु त्याचदिवशी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी पौर्णिमा लागत असल्याने नेमके विसर्जन सकाळी की दुपारनंतर करायचे, याबाबत गणेशभक्तांच्या मनात गोंधळ वाढला आहे. पंचांगकर्त्यांनी मात्र ८ सप्टेंबरला दिवसभरात कधीही विसर्जन करण्यासंबंधी खुलासा केला आहे.गणेशोत्सवात आता हळूहळू रंगत वाढत चालली आहे. पावसाळी वातावरण असतानाही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. पाच दिवसांनंतर बाप्पाला वाजत-गाजत निरोप दिला जाईल; परंतु यंदा विसर्जनतिथीबाबत सर्वसामान्य भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सोमवार, दि. ८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. मात्र, सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी प्रोष्ठपदी अर्थात भाद्रपद पौर्णिमेला प्रारंभ होत आहे. दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.९) सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होईल. त्यामुळे अनंत चतुर्दशी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंतच असल्याने त्या कालावधीच्या आत विसर्जन करावे लागेल. कारण नंतर पौर्णिमेस प्रारंभ होत असल्याने विसर्जन करता येत नाही. दुसऱ्या दिवशी महालयारंभ अर्थास पितृपक्षास प्रारंभ होत असल्याने श्राद्धकाळात गणेशविसर्जन होऊ शकत नाही. परिणामी, नेमके विसर्जन कधी आणि केव्हा करावे, यासारखे प्रश्न सर्वसामान्य भाविकांच्या मनात गोंधळ माजवत आहेत. सर्वसाधारणपणे बाप्पाची विधिवत पूजा करून आणि नैवेद्य दाखवून दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जाते. परंतु यंदा चतुर्दशी सकाळी पावणे अकराच्या दरम्यानच संपत असल्याने चतुर्दशी संपण्याच्या आत विसर्जन करावे लागेल, असा एक मतप्रवाह गणेशभक्तांमध्ये आहे. दाते पंचांगकर्त्यांनी ८ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे केव्हाही गणेशविसर्जन करावे, असा खुलासा केला आहे. (प्रतिनिधी)