शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बँक खाते काढण्याची सक्ती चुकीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST

सातपूर : दीडशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. बँक खाते ...

सातपूर : दीडशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना हजार रुपयांचे बँक खाते सक्तीचे केले आहे. त्यामुळे पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा क्लिस्ट निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेच्या वतीने विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध शासकीय योजना व शिष्यवृत्ती घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आहे. परंतु हे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नवे बँक खाते उघडावे लागत आहे. सुट्टीतील ३५ दिवसांचे अनुदान पहिली ते पाचवी १५६ रुपये तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता २३४ रुपये ठरणार आहे. कोरोना संकटामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अशा परिस्थितीत शासनाने हा निर्णय घेतला असल्याने पालकांच्यासुद्धा चिंता वाढल्या आहेत.

किमान दीडशे रुपयांच्या निधीसाठी एक हजार रुपये ते पाचशे रुपये भरून बँक खाते उघडणे अनेक पालकांना परवडणारे नसून हा निर्णय शासनाने रद्द करावा, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच रक्कम जमा करण्याचा आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्याच खात्यावर पैसे जमा करण्याचा आग्रह धरण्याऐवजी पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले पाहिजेत, अशीही मागणी छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे, युवक प्रदेश अध्यक्ष शिवा तेलंग, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, नाशिक जिल्हा अध्यक्ष विजय खर्जुल आदींनी विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.

फोटो : शालेय पोषणसाठी विद्यार्थी बँक खाते काढण्याचे क्लिष्ट नियम रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देताना छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे. समवेत शिवा तेलंग, शिवाजी मोरे, विजय खर्जुल आदी.

080721\08nsk_35_08072021_13.jpg

 शालेय पोषणसाठी विद्यार्थी बँक खाते काढण्याचे क्लिष्ट नियम रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना देतांना छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे समवेत शिवा तेलंग,शिवाजी मोरे,विजय खर्जुल आदी.