शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांच्या आवारात पोस्टर्सवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:45 IST

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, संघटनांनी लावलेले फलक, बॅनर्स काढले जात असताना शासकीय कार्यालयांमध्येदेखील शासनाच्या योजनांच्या जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत,

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, संघटनांनी लावलेले फलक, बॅनर्स काढले जात असताना शासकीय कार्यालयांमध्येदेखील शासनाच्या योजनांच्या जाहीरात फलक लावण्यात आलेले आहेत, आयोगाने आता शासकीय व निमशाासकीय कार्यालयाच्या आवारात राजकीय वा शासकीय फलकबाजी करण्यावर निर्बंध लादले असून, तसे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढले आहेत.निवडणूक आयोगाने १० मार्चपासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपावेतो आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच मतदारांवर थेट प्रभाव पडणार नाही अशा स्वरूपाचे कृत्य होवू नये म्हणून नाशिक जिल्ह्णातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांच्या आवारात निवडणूक प्रचारास प्रतिबंध करण्यात आला  आहे.याशिवाय शासकीय कार्यालयाच्या आवारात केंद्र वा राज्य सरकारच्या योजनांची माहिती व मंत्र्यांचे छायाचित्र असलेले बॅनर्सदेखील काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्टÑीय उपक्रम असेल तर त्याची फक्त जनहितासाठी माहिती देता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि. १९ मार्च ते ४ मे २०१९ पावेतो जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व शासकीय व निमशासकीय विश्रामगृहांच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी व हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणुकी संदर्भात पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे किंवा राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे इत्यादी बाबीवर निर्बंध घालण्यात आले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक