शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आमिष गृहोद्योगाचे, वापर शक्तिप्रदर्शनासाठी

By admin | Updated: December 4, 2014 00:37 IST

महिलांचा फसवणुकीचा आरोप : कथित संघटनेच्या प्रमुखाचा प्रवेश सोहळा; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे घूमजाव

नाशिक : शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रवेशाचे अनेक सोहळे यापूर्वी नाशिककरांनी पाहिले असतील; परंतु बुधवारी शक्तिप्रदर्शनाचा अजब नमुना सर्वांनाच चक्रावून सोडणारा ठरला़ अपरिचित अशा आक्रमण संघटनेच्या नेत्याने शक्कल लढवत हजारो महिलांना नाशकात गृहोद्योगाचे आमिष दाखवत आणले खरे; परंतु आपला वापर पक्षप्रवेशासाठी शक्तिप्रदर्शनाकरिता होत असल्याची मेख संबंधित महिलांच्या लक्षात आल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली़ संबंधित नेत्याचा हा प्रवेश सोहळा राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यासमक्ष घडत असताना आणि महिलांनीही त्यासंबंधी आरोपाच्या फैरी झाडल्या असताना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र सारवासारव करीत चुप्पी साधली़शहराच्या विविध भागांतील गृहिणींना चॉकलेट, मसाला, पापड, चपात्या लाटणे आदिंच्या माध्यमातून रोजगार मिळेल असे सांगत आक्रमण या संघटनेने सभासद करून घेतले़ यासाठी पन्नास रुपयांपासून तर पाचशे रुपयांपर्यंत फी घेण्यात आल्याचे महिलांनी सांगितले़ हजारोंच्या संख्येने सदस्य झालेल्या या महिलांना प्रशिक्षण व मेळाव्याच्या नावाखाली बुधवारी आक्रमण संघटनेचे नेते संतोष शर्मा याने बी़ डी़ भालेकर मैदानावर येण्यास सांगितले़ त्यासाठी सुमारे पन्नास ते साठ आयशर गाड्यांची व्यवस्थाही केली़ मेळाव्याला येणाऱ्या महिलांचे फॉर्म भरून घेतले जातील, प्रशिक्षण दिले जाईल, ज्या महिला येणार नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील, त्यांना काम मिळणार नाही, असेही सांगितले गेले़ यामुळे हजारोंच्या संख्येने महिला आपल्या लहानग्यांसह जमा झाल्या़यानंतर संघटनेने आलेल्या महिलांना प्रशिक्षण वा मेळावा न घेता रॅली काढून ती राष्ट्रवादी भवन येथे नेली़ यामध्ये आपला (राजकीय) मोर्चासाठी उपयोग केला जात असल्याचे पाहून काही महिलांनी मैदानावरच थांबण्यात धन्यता मानून संघटनेवर फसवणुकीचे आरोप केले़ राष्ट्रवादी भवनजवळ मोर्चा गेल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे व जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पगार यांनी या नेत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वाटून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत येण्याचे आवतन दिले़या कार्यक्रमानंतर महिलांची फसवणूक झाल्याची तक्रार कानावर येताच या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षप्रवेशाचा निर्णय भुजबळसाहेब घेतील असे सांगून घूमजाव करीत संघटनेच्या फसवणुकीशी राष्ट्रवादीचा संबंध नसल्याचे जाहीर करून टाकले़ अशा प्रकारे एका संघटनेने मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करण्यापूर्वी केलेल्या शक्तिप्रदर्शनाचे अनोखे उदाहरण शहरवासीयांना बुधवारी पाहायला मिळाले़ (प्रतिनिधी)