शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी

By admin | Updated: September 4, 2014 00:04 IST

बागलाण सभापतिपद अनुसूचित महिलेसाठी

सटाणा : गेल्या साडेसात वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव असलेले बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद जाहीर होऊन सोडतीत पुन्हा महिलांचेच नशीब फळफळले. यामुळे महिलांच्या गोटात ‘अच्छे दिन’ आले आहेत, तर कायमस्वरूपी अनु. जमातीसाठी राखीव असलेल्या सभापतिपदासाठी पुरुषांना लॉटरी लागावी म्हणून इच्छुक गणपती पाण्यात बुडवून होते, मात्र त्यांच्या नशिबी ‘बुरे दिन’ आल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. चौदा सदस्य असलेल्या बागलाण पंचायत समितीचे सभापतिपद गेल्या दहा वर्षांपासून कायमस्वरूपी अनु. जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील सदस्यांना उपसभापतिपदावरच समाधान मानावे लागते. असे असले तरी आपलीच चलती राहील यासाठी उपसभापतिपद मिळविण्यासाठी चुरस असते. अडीच वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने उपसभापती पदावर डोळा ठेवून शिवसेनेच्या अहिल्या माळी यांना सभापतिपदाचे आमिष दाखवून फिल्डिंग लावली होती. मात्र भाजपाने कॉँग्रेसकडे सभापतिपदासाठी अनु. जमातीचा महिला उमेदवार नसल्यामुळे उपसभापतीची आॅफर दिली होती. कॉँग्रेसही राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपाची आॅफर स्वीकारून नांदत आहेत. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने पंचायत समितीमधील भाजपाबरोबरची युती तोडली तरच कॉँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करू, असा दम भरून कॉँग्रेसचे एक प्रकारे नाक दाबण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही कॉँग्रेसची आदळ आपट झाल्यानंतर आघाडी झाली खरी मात्र तीही औटघटकेची ठरली. सभापतिपदाची मुदत एकवीस सप्टेंबरला संपते आहे. पदासाठी भाजपचे विद्यमान सभापती गीता सोनवणे, माजी सभापती जिजाबाई सोनवणे, शिवसेनेच्या अहिल्या माळी या इच्छुक आहेत तर उपसभापती पदासाठी कॉँग्रेसचे भास्कर बच्छाव, सोमनाथ सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे वसंतराव भामरे, रखमाबाई सोनवणे इच्छुक आहेत. या पदासाठी इच्छुकांच्या हालचाली सुरू झाल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी बागलाणच्या जागेवर दोन्ही कॉँग्रेस दावे करत असताना माजी आमदार संजय चव्हाण यांनी, तर राष्ट्रवादीला जागा सोडल्याचे जाहीर करून मीच पक्षाचा उमेदवार असल्याचा दावा केल्यामुळे कॉँग्रेसच्या गोटात कमालीची अस्वथता पसरली आहे. अशी परिस्थिती असली तरी डिपॉझिट जप्त झालेल्या कॉग्रेसने चव्हाणांच्या बंडाळीमुळेच पक्षाचे नुकसान होत असल्याचा आरोप करून जागा सोडण्यास स्पष्ट नकार दिला आहे . याभूमिकेचा सभापती पदाच्या निवडणुकीवर परिणाम होवून तालुक्याचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.(वार्ताहर)