शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडू यांच्याविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:42 IST

नाशिक :अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाविरुद्ध मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. महापालिका आयुक्तांचे समर्थन करतानाच बच्चू कडू यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी (दि.२४) आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेतली असता, त्यावेळी कडू यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर बच्चू कडू यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. नंतर न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. आयुक्तांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२५) महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र जमत प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. यावेळी ‘बच्चू कडू हाय हाय’च्या घोषणा देण्यात आल्या. बच्चू कडू यांच्यावर कठोर कारवाईचीही मागणी करण्यात आली. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, शिवसेनेचे गटनेता विलास शिंदे, भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, म्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे, अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी यावेळी भाषणे करत या साऱ्या प्रकरणात आयुक्तांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिवाय, बच्चू कडू यांची कृती निषेधार्ह असल्याचे सांगत कारवाईची मागणी करण्यात आली. लेखणी बंद आंदोलन मागेम्युनिसिपल कामगार कर्मचारी सेनेने काळ्या फिती लावण्याबरोबरच लेखणी बंद आंदोलन पुकारले होते. परंतु, महापौर रंजना भानसी आणि महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी बच्चू कडू यांच्याविरुद्ध आता कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी लेखणी बंद आंदोलन मागे घेण्याची सूचना केली. त्यानुसार कर्मचारी सेनेने आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.क्रेडाईसह विविध संस्थांचाही सहभागकर्मचारी व अधिकारी यांनी पुकारलेल्या आंदोलनात शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या क्रेडाईसह वास्तुविशारद आणि अभियंता यांच्या संघटनांचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लब, लायन्स क्लब, निरामय जॉगिंग ट्रॅकचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी बच्चू कडू यांच्या कृतीचा निषेध करत आयुक्तांनाही निवेदन दिले.