शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

आय-२० कार झाडावर आदळून चक्काचूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 00:32 IST

नाशिक : पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव आय- २० कार झाडावर आदळून कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़२५) पहाटे त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव आय- २० कार झाडावर आदळून कारमधील तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि़२५) पहाटे त्र्यंबकरोडवरील वेदमंदिराजवळ घडली़  भरधाव कार धोपावकर कॉर्नरच्या संरक्षक जाळ्या तोडून झाडावर जाऊन आदळली. यामुळे या कारचा अक्षरश: चक्काचूर झाला़ सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसून यातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़  सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास सातपूरकडून हुंडाई कंपनीची लाल रंगांची आय-२० कार (एमएच १५, एफएफ २९२४) भरधाव आली़ या कारचालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती वेद मंदिराच्या समोरील धोपावकर कॉर्नरकडे वळाली व संरक्षक जाळ्या तोडून झाडावर जाऊन आदळली़ यामुळे झालेल्या जोरदार आवाजामुळे आसपासचे रहिवासी जागे झाले असता कार झाडाला आदळल्याचे दिसले़ त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली असता काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने कारला बाहेर काढून त्यातील जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले़ मात्र जखमींच्या सांगण्यावरून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले़ या अपघात प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दाखल झालेली नव्हती़