शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

भरीव कामांची अंजनेरीला प्रतीक्षा!

By admin | Updated: July 29, 2016 01:44 IST

यंत्रणेपुढे आव्हान : ३४.७१ टक्केच कामे पूर्ण

 संजय वाघ त्र्यंबकेश्वर तालक्यातील अंजनेरी या ४९३४ लोकवस्तीच्या गावाला सुमारे दीड वर्षापूर्वी आदर्श संसद ग्राम योजनेच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आले... गावकऱ्यांचे हृदय तेव्हा सुपाएवढे झाले होते... विकास, विकास काय म्हणता तो गावाच्या अंगाखांद्यावर ओसंडून वाहील अशी स्वप्ने जो तो रंगवित होता. एकूण १९० कामांचा आणि ६७७.१३ कोटी रुपयांचा सूक्ष्म आराखडा आखण्यात आला. जिल्हाधिकारी स्तरावर बैठकांमागून बैठकाही पार पडल्या. आराखड्याच्या कामात आणि रकमेतही घट झाली. १२१ कामे आणि ६२५ कोटी खर्चावर शिक्कामोर्तब झाले... जितक्या बैठका झाल्या, तेवढ्या प्रमाणात कामांची पूर्तता झाल्याचे वरकरणी सध्या तरी दिसत नाही. १२१ पैकी अवघी ४२ कामे (३४.७१ टक्के) पूर्ण झालेली असली तरी भरीव अशा कामांची अंजनेरी गावाला प्रतीक्षा लागून आहे.अंजनेरी गावाला हनुमानाची जन्मभूमी म्हणून एक धार्मिक महत्त्व आहे. या पावनभूमीचा शासन योजनेच्या माध्यमातून विकास घडवून आणावा या उद्देशाने खासदार गोडसे यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यांनी प्रयत्नही केले. दीड वर्षात ४२ कामे मार्गी लागली. त्यात तळ्याची वाडी व हनुमाननगर येथे डिजिटल अंगणवाडी, गावातील रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण, ग्रामपंचायत क्षेत्रात एलईडी दिव्यांचा वापर, गावातील विविध वाड्यांमध्ये सौर ऊर्जेचे दिवे आणि सौर पोलवर दिशादर्शक फलक या कामांचा समावेश आहे. ग्राम सचिवालय, स्मशानभूमीत निवारा शेड व संरक्षक भिंत, दऱ्याची वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण, दोन ठिकाणी केटीवेअर आणि अंजनेरी गावठाणात डिजिटल अंगणवाडी ही सहा कामे मंजूर असली तरी प्रत्यक्ष कामाचा अद्याप मुहूर्त लागलेला नाही. २५ लाखाहून अधिक रकमेची दहाच्या वर कामे आजही मंजुरीसाठी रखडलेली आहेत. केंद्र शासनाची योजना तशी उत्तम आहे. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब असे जे बोलले जाते, त्यातही आता अपूर्णता वाटायला लागली आहे. दीड वर्षाचा काळ उलटला आणि मुदत पूर्ण व्हायला केवळ तीन महिने उरले आहेत. या अल्प वेळेत आराखडा प्रत्यक्षात उतरेल अशी चिन्हे दिसत नाहीत.