शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

नगरसेवकांच्या श्रेयवादावरून उद्यानाला टाळे

By admin | Updated: May 12, 2017 01:53 IST

सिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मध्ये काही महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण खुले करण्यात आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : येथील प्रभाग क्रमांक २४ मध्ये काही महिन्यांपूर्वी नागरिकांसाठी स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण खुले करण्यात आले आहे. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याने अल्पावधीतच उद्यानाची दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे प्रभागातील नगरसेवकांच्या श्रेयवादावरून ऐन सुटीच्या काळातच खेळण्याच्या उद्यानाला कुलूप लावण्यात आल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.जुने सिडको येथील प्रभाग क्रमांक २४ मधील मलनिस्सारण केंद्राच्या जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान व क्रीडांगण उभारण्यासाठी नगरसेवक कल्पना पांडे यांनी प्रस्ताव होता. मनपा निवडणुकीच्या तोंडावरच या उद्यान व क्रीडांगणाचे लोकार्पण युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होेते. परंतु लाखो रुपये खर्च करून उद्यानात उभारण्यात आलेली विद्युत दिव्यांची तोडफोड झालेली असून, याबरोबरच येथील लॉन्स खराब झाले आहे. तसेच येथील जॉगिंग ट्रॅक धुळीमुळे खराब झालेले असतानाही मनपा प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही. यातच ऐन सुटीच्या काळात उद्यानाला कु लूप लावण्यात आल्याने खेळण्यासाठी येणाऱ्या बालगोपाळांना येत नसल्याने त्यांचाही हिरमोड होत आहे. लोकार्पण झाल्यानंतर अल्पावधीतच उद्यानाला देखभालीअभावी घरघर लागली असल्याचे चित्र बघावास मिळत आहे. या उद्यानात लावण्यात आलेली रोपे पाण्याअभावी कोमजली असून, झाडांच्या ठिकाणी गाजरगवत वाढले आहे. तसेच लॉन्स खराब झाले आहे. उद्यानात सुरक्षा रक्षकांसाठी जागा केली असली तरी सुरक्षा रक्षकच नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. या उद्यानात ठिकठिकाणी बसविण्यात आलेले आकर्षक विद्युत दिवे फुटले आहे.